राम मंदिरसाठी अयोध्येच्या साधूंनी घेतली आदित्यनाथ यांची भेट

yogi adityanath
प्रातिनिधिक फोटो

अयोध्येतील राम मंदिरच्या मुद्द्यांला हात घालत लाखो मतांनी जिंकून आलेले भाजप सरकार या विषयाकडे अजूनही गांभीर्याने पाहात नाही. त्यामुळे अयोध्यातील साधूंनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीसाठी अयोध्येचे साधू लखनऊला गेले. या भेटीमध्ये त्यांनी अयोध्यामध्ये राम मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर सुरु करण्याची विनंती केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघावी – योगी
बैठकीवेळी अयोध्येच्या साधूंनी अयोध्येचा विकास आणि राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्याची विनंती आदित्यनाथ यांच्याकडे केली. या बैठकीत अयोध्येचा विकास लवकरात लवकरात करण्याचे आश्वासन योगींनी दिले. त्याचबरोबर ‘राम मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघायला हवी’, असेही त्यांनी सांगितले.

‘कुठल्याही नकवीला ओळखत नाही’
अयोध्येच्या साधूंनी योगी आदित्यनाथ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्यावर नाराजी व्यक्त केली. मुख्तार अब्बास यांनी ‘२०१९च्या निवडणुकीचा अजेंडा हा राम मंदिराचा नसून विकासाचा असेल’, असे विधान केले होते. या विषयावर अयोध्येचे साधू म्हणाले की, ‘आम्ही कुठल्याही नकवीला ओळखत नाही, आम्ही फक्त भाजपला ओळखतो’. त्याचबरोबर साधू म्हणाले की, ‘राम मंदिराच्या बांधकामाला भाजपने गांभीर्याने घेतले नाही, तर २०१९च्या निवडणुकीला काय करायचे ते आम्ही बघून घेऊ’.