Corona Update: देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४४ लाख पार!

Single-day spike of 95,735 new COVID19 cases & 1,172 deaths reported in India
Corona Update: देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४४ लाख पार!

देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांची संख्येते देखील विक्रम वाढ होत आहे. देशात कोरोना विषाणू प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून मागील २४ तासांत सर्वाधिक ९५ हजार ७३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार १७२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४४ लाख ६५ हजार ८६४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७५ हजार ६२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३४ लाख ७१ हजार ७८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ९ लाख १९ हजार १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना चाचणीवर अधिक भर दिला आहे. त्यामुळे नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. ९ सप्टेंबरपर्यंत देशात ५ कोटी २९ लाख ३४ हजार ४३३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ११ लाख २९ हजार ७५६ नमुन्यांच्या चाचण्या बुधवारी दिवसभरात झाल्या आहे, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

जगातील कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ८० लाखांहून अधिक असून ९ लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचा कहर अमेरिका, भारत, ब्राझील, रशिया या देशांमध्ये आहेत. सध्या भारत जगातील कोरोनाबाधितांच्या यादीत ब्राझील मागे टाकून दुसऱ्या स्थानावर आहे.


हेही वाचा – ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी थांबविण्याचा निर्णयावर WHO ‘ही’ प्रतिक्रिया