घरदेश-विदेशभारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये पुन्हा धक्काबुक्की

भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये पुन्हा धक्काबुक्की

Subscribe

लडाख येथील सीमारेषेवर गस्त घालत असताना दोन्ही देशांच्या सैनकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय सैनिक आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. याअगोदर 15 ऑगस्ट 1947 रोजी हा प्रकार घडला होता. आता पुन्हा एकदा असा प्रकार घडला आहे. लडाखमध्ये 134 किमी लांबीच्या पॅगाँग लेकच्या उत्तर किनाऱ्यावर हा प्रकार घडला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. सध्या या भागात दोन्ही देशांनी सैनिकांची संख्या वाढवली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

भारतीय सैनिक पॅगाँग लेकच्या उत्तर किनाऱ्यावर गस्त घालत होते. यावेळी चीनच्या सैनकांनी भारतीय सैनिकांना गस्त घालण्यास विरोध केला. त्यामुळे दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली आणि या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही देशांचे सैन्य ब्रिगेडीअर स्तरावरील अधिकारी चर्चा करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल संदर्भात दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या मतभिन्नतामुळे अशा घटना घडत असल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -