घरताज्या घडामोडीसुशांतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडाला NCBने घेतले ताब्यात; अडीच तासांच्या झाडाझडतीनंतर कारवाई

सुशांतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडाला NCBने घेतले ताब्यात; अडीच तासांच्या झाडाझडतीनंतर कारवाई

Subscribe

सुशांतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडाला एनसीबीने अटक केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कारवाईला सुरुवात केली आहे. केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीच्या मुंबईतील घरावर आज, शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. रिया – शोविक ड्रग्ज प्रकरणी हा छापा टाकण्यात आला होता. तर, एनसीबीची दुसरी टीम सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडाच्या घरी पोहोचली होती. दरम्यान, एनसीबीच्या पाच सदस्यांकडून अडीच तासाच्य़ा झाडाझडती नंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

चार अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक

एनसीबीने आतापर्यंत चार अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याचे अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांसोबत संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड तसेच मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा विकणाऱ्या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा – धक्कदायक! बिल वाढवण्यासाठी कोरोना रुग्णाच्या मृतदेहाला ठेवलं २ दिवस व्हेंटिलेटरवर!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -