घरताज्या घडामोडीमृत सुशांत सिंह बिहार निवडणुकीचा 'पोस्टर बॉय'? भाजपने छापले स्टिकर

मृत सुशांत सिंह बिहार निवडणुकीचा ‘पोस्टर बॉय’? भाजपने छापले स्टिकर

Subscribe

बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून आपापले मुद्दे रेटायला सुरुवात केली आहे. दरम्यान भाजपने बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाला प्रचाराचा मुद्दा बनविल्याचे दिसते. भाजपच्या कला संस्कृती सेलचे संयोजक वरुणकुमार सिंह यांनी सुशांतचा फोटो असल्याचे स्टिकर्स छापले आहेत. या स्टिकरवर “ना भुले है, ना भूलने देंगे|” असे वाक्य लिहून सुशांतचा फोटो छापला आहे. त्या फोटोवर #JusticeforSushant हे अभियान राबवायला सुरुवात केली आहे.

कला संस्कृती सेलच्या वरुणकुमार सिंह यांनी सांगितले की, सुशांतचा मृत्यू १४ जूनला झाला. त्यानंतर लगेचच १६ जूनपासून आम्ही सुशांतला न्याय मिळण्यासाठी अभियान सुरु केले होते. यासाठी आतापर्यंत भाजपच्या या सेलने ३० हजार स्टिकर आणि ३० हजार मास्क वाटले आहेत. भाजपसोबतच राजपूत समाजाच्या करणी सेनेने देखील सुशांतच्या विषयाचे स्टीकर आणि मास्क बनवून छापले आहेत.

- Advertisement -

सध्या अभिनेत्री कंगणा राणावत ही ट्विटरवर महाराष्ट्र आणि मुंबईच्या बाबतीत भडकाऊ विधाने करत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टार्गेट केले जात आहे. मुंबईला POK आणि तालिबान सारख्या उपमा दिल्या जात आहेत. या सर्व वातावरणाचा उपयोग बिहार निवडणुकीसाठी तर केला जाणार नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

सुशांत प्रकरणात पारदर्शक तपासाची मागणी

बिहार भाजपचे प्रदेश अध्यक्ष संजय जयस्वाल यांनी सांगितले की, भाजपला सुशांत प्रकरणात पारदर्शक तपासाची अपेक्षा आहे. सध्या या प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी सुरु आहे. शुक्रवारी ड्रग्ज कनेक्शनच्या आधारावर एनसीबीने मोठी कारवाई केली होती. रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सुशांतचा माजी मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर कोर्टाने त्यांना ९ सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -