‘तुझ्यात जीव रंगला’ टीमची केरळवासीयांना आर्थिक मदत

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने इतर मालिकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या मालिकेचे निर्माते आणि कलाकार यांनी ६०० भागांच्या सेलिब्रेशनचा खर्च केरळला देत वेगळ्या पद्धतीने आपला आनंद साजरा केला आहे.

Mumbai
gopal shetty
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या शुटिंगला सुरुवात होणार!

‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठीवरील गाजलेली मालिका घराघरामध्ये लोकप्रिय झाली आहे. ही मालिका प्रेक्षकांचं केवळ मनोरंजनच नाही तर वेळोवेळी सामाजिक संदेश देखील देत असते. सर्वांच्या घरामध्ये पोहोचलेल्या या मालिकेने इतर मालिकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या मालिकेचे नुकतेच ६०० भाग पूर्ण झाले असून याचे सेलिब्रेशन न करता ‘तुझ्यात जीव रंगला’ या टीमने सामाजिक भान जपत केरळवासीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

६०० भागांच्या सेलिब्रेशनचा खर्च केरळला देणार

केरळमध्ये आलेल्या महाप्रलयानंतर केरळला मदत करण्यासाठी देशभरातील अनेक राज्य धावून आले आहेत. त्याचसोबत अनेक सेलिब्रिटी, सामाजिक संस्था आणि एनजीओने देखील मदत केली आहे. आपण देखील मदतीचा हात पुढे करावा या उद्देशाने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे निर्माते आणि कलाकार यांनी ६०० भागांच्या सेलिब्रेशनचा खर्च केरळला देण्याचा निर्णय घेतला आहे. सेलिब्रेशनचा खर्च रिलीफ फंडला देऊ केला असून या मालिकेने आपल्या यशाचा खर्च वेगळ्या पद्घतीने साजरा केला आहे.

आत्तापर्यंत केरळकडे सुमारे ७०० कोटींची मदत

केरळमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पुरात ३५० हून जास्त नागरिकांचा बळी गेला असून हजारो कोटींची वित्तहानी देखील झाली आहे. या नैसर्गिक संकटामध्ये देशभरातून केरळकडे मदतीचा ओघ सुरू आहे. अजूनही अनेक ठिकाणहून विविध स्तरातून केरळला मदतीचं आवाहन करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत सुमारे ७०० कोटींची मदत केरळकडे पोहोचली आहे.

‘यांनी’ही केली मदत

महाराष्ट्र सरकारच्या आवाहनास प्रतिसाद देत राज्याच्या अन्न आणि औषध विभागाकडून केरळमध्ये औषधं देखील पाठवण्यात आली होती. यामध्ये सलाईन, इंजेक्टेबल्स, कफ सिरप या औषधांचा समावेश आहे. राज्यातील सर्व औषध उत्पादक, विक्रेते आणि वितरक यांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. अन्न आणि औषध विभाग, जे. जे. रुग्णालय आणि डॉक्टर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनातर्फे केरळ राज्याकडे औषधे पाठवण्यात आली आहेत.

४० लाख रुपयांच्या औषधांचा पुरवठा

आतापर्यंत देशभरातून अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली आहे. त्याप्रमाणे अन्न आणि औषध विभागाने देखील ५ लाख औषधे केरळला पाठवली आहेत. एकूण ४० लाख रुपयांची औषधे पाठवण्यात आली आहेत.