घरदेश-विदेशइस्लामिक स्टेटच्या संशयित अतिरेक्यांना दिल्लीतून अटक

इस्लामिक स्टेटच्या संशयित अतिरेक्यांना दिल्लीतून अटक

Subscribe

ISJK या नव्या अतिरेकी संघटनेच्या दोन सदस्यांना दिल्ली पोलिसांनी काल रात्री लाल किल्ल्याजवळ अटक केली. दोघेही विद्यार्थी असून त्यांचा दिल्लीत घातपात करण्याचा कोणताही डाव नव्हता, असे पोलिसांनी सांगितले

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ‘इस्लामिक स्टेट इन जम्मू कश्मीर’ (आईएसजेके) या संघटनेशी संबंधित दोन संशयित अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष पथकाचे पोलीस उपायुक्त पी.एस. कुशवाहा यांनी सांगितले की, दोन्ही अतिरेकी काश्मीरच्या सोपियाँ जिल्ह्यातील असून त्यांची नावे परवेज (२४) आणि जमशेद (१९) अशी आहेत. लाल किल्ल्यानजीक जामा मशीदीच्या बस स्टॉपजवळ अटक केली. यावेळी त्यांच्याकडे पॉईंट ३२ च्या दोन पिस्तुल आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

हे दोघेही दिल्लीहून जम्मू-काश्मीरला जाण्यासाठी बस पकडण्यासाठी आले होते. गुरुवारी रात्री १०.४५ वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. परवेजचा भाऊ दहशतवादी असून तो यावर्षी सोपियाँ जिल्ह्यात झालेल्या चकमकीत मारला गेला होता. त्याचा भाऊ सुरुवातील हिजबुल मुजाहिदीनचा सदस्य होता नंतर त्याने आईएसजेके संघटनेत प्रवेश केला होता. परवेज सध्या उत्तर प्रदेशमधील गजरौला इतून एमटेकचे शिक्षण घेत आहे. त्याच्या दहशतवादी भावापासून तोही प्रेरीत झाला असल्याचे, पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

त्याचबरोबर जमशेद डिप्लोमाचा विद्यार्थी आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेल्या मोहम्मद अब्दुला बाशितच्या आंदोलनात त्याने सहभाग घेतला असल्याचे कबूल केले आहे. तो दुसऱ्यांदा दिल्लीत आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच हे दोघेही उमर इब्न नाजिर आणि आदिल थोकरच्या इशाऱ्यावर काम करत होते.

- Advertisement -

मात्र या दोघांचाही दिल्लीत घातपात करण्याचा कोणताही डाव नव्हता. दिल्लीत केवळ काही वेळासाठी मुक्काम करण्यासाठी ते राजधानीत येत असत, अशीही माहिती पोलिसांनी दिली. ‘इस्लामिक स्टेट इन जम्मू कश्मीर’ हे संघटन नवे आहे. या संघटनेने अद्याप मूळ धरलेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -