घरताज्या घडामोडीभारत-ब्रिटनची विमान सेवा सुरु; ८ जानेवारीपासून विमानं घेणार उड्डाण

भारत-ब्रिटनची विमान सेवा सुरु; ८ जानेवारीपासून विमानं घेणार उड्डाण

Subscribe

भारत-ब्रिटनची विमान सेवा येत्या ८ जानेवारीपासून सुरु होणार आहे.

ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना अवतारामुळे जगभरात दहशत पसरली आहे. हे संकट भारतात येऊ नये, याकरता केंद्र सरकारने ब्रिटनला जाणारी-येणारी सर्व विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला ३१ डिसेंबरपर्यंत उड्डाण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही बंदी वाढवण्याचाही निर्णयही घेण्यात आला. पण, आता ही बंदी उठवण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. येत्या ८ जानेवारीपासून भारत आणि ब्रिटन दरम्यानची विमानसेवा सुरु होणार आहे.

- Advertisement -

२३ डिसेंबरपासून विमान सेवा बंद

गेल्या २३ डिसेंबर २०२० पासून दोन देशांमधील विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, आता नव्या वर्षात सर्व विमानं येत्या ८ जानेवारीपासून सुरु होणार आहे. पण, सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही काळ जाणार आहे.

१५ उड्डाणांना परवानगी

येत्या २३ जानेवारीपर्यंत फक्त १५ उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरु आणि हैदराबाद येथून ब्रिटनला जाणारी १५ विमानं दर आठवड्याला उडू शकतील, असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोणी कितीही आदळआपट केली तरी मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वावर डाग लागणार नाही – मुख्यमंत्री


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -