घरदेश-विदेशBhagat Singh Memories : शहीद भगत सिंग यांचे Unknown Facts!

Bhagat Singh Memories : शहीद भगत सिंग यांचे Unknown Facts!

Subscribe

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अवघ्या २३ व्या वर्षी फासावर चढलेले शहीद भगत सिंह यांची आज, २८ सप्टेंबर रोजी जयंती आङे. क्रांतिकारी शहीद भगत सिंह यांचा जन्म २३ सप्टेंबर १९०७ रोजी लायलपूर जिल्ह्यातील बंगा येथे झाला होता. फाळणीनंतर हा भाग आता पाकिस्तानात आहे. २३ मार्च १९३१ साली भगत सिंह यांना त्यांचे साथीदार सुखदेव आणि राजगुरू यांच्यासह फाशी देण्यात आली होती. त्यांच्याबाबतच्या काही गोष्टी जयंतीनिमित्त जाणून घेऊया…

  • भगत सिंह हे चार्ली चॅपलिनचे चाहते होते. त्यांचे चित्रपट पाहायला त्यांना खुप आवडत असे. चार्ली चॅपिलन यांचे चित्रपट पाहून त्यांना प्रेरणा मिळत होती. स्वतःचा खर्च वाचवून ते चार्ली चॅपलिन यांचे चित्रपट पाहायचे.
  • भगत सिंह यांना रसगुल्ले खुप आवडायचे. ते खवय्ये होते. स्वीट डिशमध्ये त्यांना सर्वाधिक रसगुल्लेच आवडत असे. जेव्हा त्यांना रसगुल्ले खाण्याची संधी मिळायची ते त्यांच्या मित्रांनाही घेऊन जायचे.
  • मोठे शूज ही भगत सिंह यांची फेव्हरिट होती. तेदेखील इतर युवांसारखे स्टाईलिश राहणं पसंत करत होते. आजही अमृतसर येथील म्युजियमध्ये त्यांचे लांबलचक शूज पाहायला मिळतात.
  • कुटुंबियांचे लाडके भगत सिंह हे देखील घरच्यांशी जवळीक साधून होते. त्यांच्या फाशीच्या शिक्षेची बातमी कळताच त्यांच्या आईने गुरुद्वारेमध्ये पाठ केला होता. याबाबत माहिती मिळताच त्यांनी आपल्या आईशी संवाद साधला होता.

हेही वाचा –

लॉकडाउन काळात हृदयविकारावर १०० यशस्वी शल्यचिकित्सा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -