घरCORONA UPDATECorona: झोपेतच झाला 'त्या' अधिकाऱ्याचा मृत्यू; देत होते कोविड-१९ चे प्रशिक्षण

Corona: झोपेतच झाला ‘त्या’ अधिकाऱ्याचा मृत्यू; देत होते कोविड-१९ चे प्रशिक्षण

Subscribe

उत्तराखंडमध्ये कोविड – १९ संदर्भात प्रशिक्षण देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याचा खुर्चीवर बसले असताना झोपेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तराखंडमधील उधमसिंग नगर जिल्ह्यात या ४७ वर्षीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून ते झोपेतच आहेत, असे वाटत असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. जसवंत सिंग असे त्या अधिकाऱ्याचे नाव होते. रुद्रपुर येथील पब्लिक वर्क विभागात असिस्टंट इंजिनिअर म्हणून कार्यरत असणारे जसवंत सिंग यांची कोविड १९ च्या प्रशिक्षणाकरता किच्चा पालिकेत नियुक्ती करण्यात आली होती.

हेही वाचा – महाराष्ट्रात आम्ही ‘डिसीजन मेकर’ नाही; राहुल गांधींचं खळबळजनक विधान

- Advertisement -

नेमकं काय घडलं 

राज्यातील स्थलांतरीतांची नोंद आणि त्याबाबतचा अहवाल बनवण्यासाठी प्रशिक्षण देण्याकरता त्यांची नेमणूक करण्यात आली होती. प्रशिक्षणाच्या दरम्यान, ते खुर्चीवर डोळे बंद करून बसले असताना सिंग झोपेतच असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांना वाटले. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी सिंग यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता ते खाली कोसळले. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या सेंटरमधील डाटा ऑपरेटर आणि त्यांचे सहकारी प्रवीण सिंग यांनी सांगितले की, ट्रेनिंग कार्यक्रम सुरू होण्याआधीपासून त्यांना तब्येत खराब असल्यासारखे वाटत होते. रुद्रपुरमध्ये रात्री उशीरापर्यंत क्वारंटाईन सेंटरमध्ये ड्युटी करत असल्यामुळे थकवा जाणवत होता. त्यांनी सहकाऱ्याला प्रशिक्षण सुरू ठेवण्यास सांगितले आणि खुर्चीवर डोळे मिटून आराम करत बसले. संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत ते तशाच अवस्थेत होते. आम्हाला वाटलं ते झोपले आहेत. मात्र झोपेतच त्यांचा मृत्यू झाला होता. जसवंत सिंग यांच्या मृत्यू नेमका कशाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या मेडिकल अहवालानंतर ते स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -