घरदेश-विदेशअबुधाबीत रंगणार संरक्षण विषयावर साहित्य संमेलन !

अबुधाबीत रंगणार संरक्षण विषयावर साहित्य संमेलन !

Subscribe

निलेश गायकवाड यांची अनोखी झलक

मुकुंद लांडगे

- Advertisement -

साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मक्ता सारस्वत म्हणवल्या जाणाऱ्या विशिष्ट वर्गाकडेच आहे, असे मानण्याचे कारण नाही. देशभरात आणि जगात आजवर पार पडलेल्या साहित्य संमेलनांतून मराठी भाषेतील कथा, कविता, कादंबऱ्या ललित लेखन यावर भर देण्यात येतो. मात्र यापलिकडे जाऊन मराठी भाषा ही सर्व प्रांतात पोहोचण्यासाठी पुण्यातले तरुण उद्योजक निलेश गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे. संरक्षण आणि पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने येत्या ८ ते १० सप्टेंबर या काळात अबुधाबीत हे विश्व मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे.

या साहित्य संमेलनात मुंबईसह देशाच्या सुरक्षेचे प्रतिबिंब उमटणार आहे. त्यात ‘अंतर्गत आणि बाह्य सुरक्षाङ्क या एकाच विषयावर देभरातील संरक्षण दल तसेच पोलीस खात्यातले बडे अधिकारी आपली मते मांडणार आहेत. देशभरातील अंतर्गत सुरक्षेवर माजी पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे हे तर देशाच्या बाह्य सीमा सुरक्षेवर एअरचीफ मार्शल भूषण गोखले यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे.

- Advertisement -

निलेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून पार पडणारे एकाच विषयावरील हे साहित्य संमेलन म्हणजे संरक्षण आणि पोलीस दलाला पर्वणीच समजली जाते. या साहित्य संमेलनाचे हे आठवे वर्ष असले तरी एकाच विषयावर सतत तीन वर्षे हे संमेलन पार पडत असल्याचे गायकवाड यांनी ‘महानगरङ्कशी बोलताना सांगितले. संमेलनात नागरिकांच्या सुरक्षेबाबतचे विषय असावेत यासाठी या संमेलनात खोपडे यांनी त्यांच्या कार्यकाळात राबवलेल्या ऐतिहासिक मोहल्ला समित्या, राज्यातील विविध दंगलींना आवर, ब्रिटीशकालीन कायदे आणि सध्याचे पोलीस प्रशासन, सुरक्षेतील उणिवा आदी विषयांवर ते बोलणार आहेत. या संमेलनाचे उद्घाटक स्वत: खोपडे असणार आहेत. मराठी साहित्यात आजवर प्राध्यापक, कवी, लेखक यांनीच लेखन केले आहे. मात्र जर देशाच्या सीमेवर काम करणारे लष्करातील अधिकारी, पोलीस अधिकारी यांनीही देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेवर साहित्य निर्माण केले तर मराठी भाषा आणखी समृध्द होईल, असे मत सुरेश खोपडे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, देशाच्या सीमेवरील सुरक्षेबाबत भूषण गोखले आपली मते मांडणार असून, त्यात ते देशाच्या सध्यस्थितीच्या सुरक्षेबाबत बोलणार आहेत. प्रसारमाध्यमे, वैद्यकीय क्षेत्र, देशाची सुरक्षा यापैकी एक विषय धरून त्यावर जगभरात संमेलने भरवली जातात, असे गायकवाड यांनी सांगितले. गेल्यावर्षी इंडोनेशिया तर त्याआधी भुतानमध्ये असे संमेलन भरवण्यात आले होते. जगाच्या पाठीवर मराठी पोहोचवण्याचा गायकवाड यांचा प्रयत्न तमाम मराठीजनांना प्रेरणा देणाराच आहे, असे खोपडे यांनी म्हटले.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -