घरदेश-विदेशपश्चिम बंगाल : तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची हत्या

पश्चिम बंगाल : तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची हत्या

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली असून या घटनेमध्ये आमदार सत्यजीत बिश्वास यांचा मृत्यू झाला आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची गोळ्या घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान, सत्यजीत यांची हत्या भाजपाच्या सांगण्यावरुन झाल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसने केल्याचे समोर आले आहे. सत्यजीत बिश्वास हे कृशनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.

सरस्वती पुजेच्या दरम्यान गोळ्या घालून हत्या

पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील शनिवारी सत्यजीत बिश्वास हे फुलबाडी परिसरात आयोजित सरस्वती पुजेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. सरस्वतीची पुजा सुरु होती. त्याच दरम्यान त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तात्काळ शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

- Advertisement -

भाजपवर गंभीर आरोप

दरम्यान, सत्यजीत यांची हत्या भाजपच्या सांगण्यावरुन झाल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. सत्यजीत यांच्या हत्येमागे भाजपच्या मुकूल रॉय यांचा हात असल्याचा आरोप तृणमूलचे जिल्हाध्यक्ष गिरीशंकर दत्ता यांनी केला आहे. तृणमूलमधील काही विश्वासघातकी लोकांनी भाजपच्या या कामासाठी मदत केल्याचा आरोपही तृणमूल काँग्रेसने ट्विटवरुन केला आहे.


वाचा – सीआयएसएफच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या

- Advertisement -

वाचा – पाकिस्तानच्या माजी खासदाराची गोळ्या झाडून हत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -