घरट्रेंडिंगकाश्मीरमध्ये सार्वमत घ्यायला सरकार घाबरतं का?- कमल हसन

काश्मीरमध्ये सार्वमत घ्यायला सरकार घाबरतं का?- कमल हसन

Subscribe

एका इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार, हसन यांनी त्यांनी पाकव्याप्त काश्मीरला 'स्वतंत्र काश्मीर' असं संबोधल्याचं वृत्त समोर आलं आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर आलेला असताना अभिनेते कमल हसन यांनी नुकतंच एक वादग्रस्त वक्तवय केलं आहे. अभिनेते कमल हासन हे मक्कल निधी मैय्यम या राजकीय पक्षाचे प्रमुख असून, त्यांनी काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची मागणी केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशात सर्वत्र संतापाचे वातावरण असताना कमल हासन यांनी केलेल्या या मागणीमुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. रविवारी रात्री एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना कमल हासन यांनी आपली भूमिका मांडली. ”भारताकडून काश्मीरमध्ये सार्वमत का घेतले जात नाही? सरकार नक्की कशाला घाबरतंय?” असा थेट सवालही त्यांनी कार्यक्रमादरम्यान उपस्थित केला. याव्यतिरिक्त एका इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार, हसन यांनी त्यांनी पाकव्याप्त काश्मीरला ‘स्वतंत्र काश्मीर’ असं संबोधल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे एकदंरच कमल हासन यांंचं बोलणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे.

- Advertisement -

दोन्ही देशांचे सरकार जबाबदार

यावेळी बोलताना काश्मीर प्रश्नाला भारत-पाकचे नेतेच जबाबदार आहेत, असंही कमल हासन म्हणाले. सरकारच्या काश्मीर नीतीवर प्रश्न उपस्थित करत ‘आपले जवान का शहीद होत आहेत? आपल्या घराचे चौकीदार का मरायला हवेत?’, असे प्रश्न त्यांनी विचारले. ‘दोन्ही देशाच्या सरकारने काश्मीरचा मुद्दा जर व्यवस्थित आढळला, तर कोणत्याच सैनिकाला आपले प्राण मगवावे लागणार नाहीत, नियत्रंण रेषा (LOC) नियंत्रणातच राहील’, असंही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

सरकार सार्वमत का नाही घेत?

हसन यावेळी म्हणाले की, ‘काश्मीरमध्ये भारताने सार्वमत घ्यावे अशी अनेक संघटनांची मागणी आहे. काश्मीरच्या जनतेला भारतासोबत रहायचे की पाकिस्तानसोबत जायचे याबाबत जनमत संग्रहित करायला हवे. आपला देश एका चांगल्या देशाच्या रुपात सिद्ध करायचा असेल, तर सध्याची भूमिका आपल्याला बदलावी लागेल’, असं मत त्यांनी यावेळी मांडलं.

भारतीय लष्कराप्रती आपलं मत मांडताना हसन म्हणाले, की ‘आपले लष्करही एका जुन्या फॅशनप्रमाणे झाले आहे. जवान काश्मीरमध्ये मरण्यासाठी चालले आहेत, असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं’, असंही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -