घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टगुजरात यावेळी भाजपच्या मागे राहणार का?

गुजरात यावेळी भाजपच्या मागे राहणार का?

Subscribe

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना देशातील वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीत आपल्या शेजारील राज्य गुजरातवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य म्हणून मागील दोन दशकांपासून गुजरात अचानक राजकीय क्षितीजावर तळपू लागले. गुजरातमध्ये तब्बल 20 वर्षे राज्य करणारा भारतीय जनता पक्ष या वेळच्या लोकसभा निवडणुकीत काय चमत्कार करणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गुजरातमधून २६ जागा जिंकल्या होत्या. त्यांना तब्बल ६० टक्के मते मिळाली होती. नरेंद्र मोदींना पंतप्रधान होताना पाहण्यासाठी गुजरात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत १८२ पैकी भाजपला केवळ ९९ जागा मिळाल्या. काँग्रेस ७७ जागांवर विजयी झाली. राज्यात भाजपने मोठ्या मुश्किलीने आपले बहुमत राखले. त्यामुळे यावेळच्या लोकसभा निवडणुकीत काय होईल याची उत्सुकता आता सर्वांनाच लागून राहिली आहे.

४.४७ कोटी मतदार करणार फैसला
गुजरातमध्ये २३ एप्रिल रोजी तिसर्‍या टप्प्यात मतदान होणार आहे. गुजरातमधील एकूण मतदारांची संख्या ४.४७ कोटी आहे. त्यात पुरुषांची संख्या २.३३ कोटी आणि महिलांची संख्या २.१४ कोटी आहे. याशिवाय गुजरातमध्ये १०५४ मतदार हे किन्नर आहेत. गुजरातमध्ये ७ लाख ६९ तरुण यावेळी प्रथमच मतदान करणार आहेत.

- Advertisement -

यावेळचे निवडणूक मुद्दे
१) शहरी भागात रोजगारीचा मुद्दा मुख्य आहे.
२) तसेच विविध समुदायांच्या आरक्षणाचा मुद्दाही गंभीर मानला जातो.
३) गुजरातचा विकास आणि आत्मसन्मान या मुद्यावरूनही मतदारांना साद घातली जाणार आहे.

गुजरातचा संक्षिप्त इतिहास
महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची गुजरातही जन्मभूमी आहे. देशाच्या पश्चिमेकडील गुजरात हे एक महत्त्वाचे राज्य मानले जाते. गुजरातच्या पश्चिमेला पाकिस्तानचा सिंध प्रांत आहे. उत्तरेला राजस्थान, दक्षिणेला महाराष्ट्र, दिव, दमण हे केंद्रशासित प्रदेश आहेत. पूर्वेला मध्य प्रदेश आहे. गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे, तर अहमदाबाद हे गुजरातमधील सर्वात प्रमुख शहर आहे. गुजरातचे क्षेत्रफळ सुमारे १९६,०२४ चौरस किलोमीटर असून, २०११ सालच्या जनगणनेनुसार गुजरातची एकूण लोकसंख्या ६०,३८३,६२८ आहे. गुजरातची मुख्य भाषा गुजराती आहे.

- Advertisement -

गुजरातमधील लोकसभा मतदारसंघ
१- खेडा, २-आणंद, ३ – सुरेंद्रनगर, ४ -जामनगर, ५ – पोरबंदर, ६ -भरुच, ७ -गांधीनगर, ८-अहमदाबाद पूर्व, ९- अहमदाबाद पश्चिम, १० -राजकोट, ११ -भावनगर, १२ -कच्छ, १३ -पांचमहल, १४ – वडोदरा, १५ – मेहसाणा, १६ -अमरेली, १७ -छोटा उदयपूर, १८ -सुरत, १९ -नवसारी, २० -वलसाड, २१ -बनासकांठा, २२ -साबरकांठा, २३-पाटन, २४ -जुनागढ, २५ -दाहोद, २६- बारडोली

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -