घरदेश-विदेश'या' वस्तूने पुरुषाचा वेशात महिलेने केले मुलींचे लैंगिक शोषण

‘या’ वस्तूने पुरुषाचा वेशात महिलेने केले मुलींचे लैंगिक शोषण

Subscribe

एका १७ वर्षीय तरुणीने पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कौशल यांच्याकडे याबाबत तक्रार केली तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला.

पुरुषाचा वेश परिधान करुन अल्पवयीन मुलींचे लैगिंक शोषण करणाऱ्या महिलेला आंध्र प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला अल्पवयीन मुलींना बोलण्यात गुंतवत आणि त्यांची फसवणूक करत असे. एका १७ वर्षीय तरुणीने याप्रकरणी प्रकासम जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कौशल यांच्याकडे याबाबत तक्रार केली तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. किशोर रेड्डी नावाच्या एका इसमाने आपले लैगिंक शोषण केल्याचा आरोप तिने केला. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारी व्यक्ती पुरुष नसून महिला असल्याचे उघडकीस आले. तिने आपले डोक्यावरील केस पुरुषांसारखे कापले होते. ती पुरुषांच्या वेशात अल्पवयीन मुलींचे लैगिंक शोषण करत असे. ही महिला आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे आपल्या पतीसोबत वास्तव्यास होती. मिळालेल्या माहितीनुसार महिलेसोबत वास्तव्यास असणारा तो व्यक्ती तिचा तिसरा पती होता.


हेही वाचा – अबब! कोट्यवधी रुपयांचा हिरे जडित सोन्याचा टॉयलेट

- Advertisement -

 

महिलेच्या पतीने केली आत्महत्या

पोलिसांनी जेव्हा महिलेच्या घरावर छापा टाकला तेव्हा एक मोठी बॅग सेक्स टॉईजने भरलेली आढळली. महिलेच्या पतीसमोर ही बाब उघडकीस आल्यानंतर तो इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर गेला आणि तिथून त्याने उडी मारली. यामध्ये महिलेचा पत्नी रक्तबंबाळ झाला आणि त्यात त्याचे प्रचंड रक्त वाया गेले. पोलिसांनी ताबोडतोब त्याला जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत महिलेला अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -