घरदेश-विदेशभूताने झपाटले म्हणत मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार

भूताने झपाटले म्हणत मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार

Subscribe

हैद्राबादमध्ये तीन मांत्रिकांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा सर्व गैरप्रकार पीडित महिलेच्या कुटुंबियांच्या संगमताने झाला आहे. हा प्रकार जवळपास वर्षभरापूर्वी झाला होता. वर्षभरापासून महिलेचा तिच्या कुटुंबियांकडून छळ सुरु आहे. मात्र, पीडित महिलेचे वडील विदेशात असल्यामुळे तिने याविरोधात आवाज उठवला नाही. पीडितेचे वडील आता देशात परत आल्यानंतर महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती तिच्या वडिलांना सांगितली. त्यानंतर तिने वडिलांसोबत पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी हैद्राबाद पोलिसांनी पीडितेवर बलात्कार करणाऱ्या तीन मांत्रिक आणि कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

पीडित महिलेचे आपल्या पतीसोबत सतत खटके उडत होते. त्यामुळे पीडितेच्या सासऱ्याने एका मांत्रिकाला याबाबत विचारले. त्यावेळी मांत्रिकाने पीडित महिलेला भूताने झपाटले असल्याचे सांगितले. याशिवाय आपण या महिलेच्या अंगातील भूत काढून देऊ, असे त्याने महिलेच्या सासऱ्याला सांगितले. या मांत्रिकाचे नाव शेख मुसा बावरीझ असे आहे. तो पीडित महिलेच्या घरी गेला आणि पीडितेच्या खोलीत शिरला आणि बलात्कार केला. त्यानंतर काही महिन्यांनी दोन मांत्रिकांनी अशाच प्रकारे महिलेवर बलात्कार केला असल्याची माहिती पीडितेनी दिली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी कलम ३५४ ब,३७६, ४१७,४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -