घरदेश-विदेशतोपर्यंत मी घरी येणार नाही - लालू पुत्र तेजप्रताप

तोपर्यंत मी घरी येणार नाही – लालू पुत्र तेजप्रताप

Subscribe

राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मुलगा माजी मंत्री तेज प्रताप यादव सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे चांगलेच चर्चेत आहेत. घटस्फोटाचा अर्ज केल्यापासून तेज प्रताप यांनी घर सोडलेले आहे. सध्या ते हरिद्वार येथे राहत असून जोपर्यंत कुटुंबीय माझ्या घटस्फोटाला पाठिंबा देत नाहीत, तोपर्यंत घरी येणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

पटना येथील स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना तेज प्रताप यांनी छोटा भाऊ तेजस्वी यादवला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. “कदाचित तेजस्वी बिहारचा पुढचा मुख्यमंत्री बनेल. मी नेहमीच त्याच्या बाजुने त्याला मदत करण्यासाठी असेल. जसे महाभारतात कृष्ण अर्जुनाची मदत करत होता.” नवी दिल्ली येथे होणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मला हजेरी लावता येणार नाही, असेही तेज प्रताप यावेळी म्हणाले.

- Advertisement -
ऐश्वर्या खूपच मॉर्डन, मी भोळसट; इच्छेविरुद्ध लग्न झालं

काही दिवसांपूर्वी तेज प्रताप बोध गया येथे शेवटचे दिसले होते. लालू प्रसाद यादव यांच्या तब्येतीची विचारपूस आणि आपल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी ते रांजी येथे गेले होते. लालू प्रसाद यादव यांना तरी आपल्या मोठ्या पुत्राचा हा निर्णय मान्य नसून त्यांनी याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सध्या चारा घोटाळ्यात ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्यांना रांची येथील हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे.

तेज प्रताप आणि एश्वर्या यांचे मे २०१८ मध्ये लग्न झाले होते. एश्वर्यायाच्या कुटुंबालाही राजकीय पार्श्वभूमी आहे. तिचे आजोबा दरोगा राय हे बिहारचे मुख्यमंत्री होते. तर वडील चंद्रीका राय लालू यादव यांच्या पक्षाचे आमदार होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -