घरताज्या घडामोडीदिवे लावण्याऐवजी अतिशहाणपणा केला आणि चांगलाच नडला

दिवे लावण्याऐवजी अतिशहाणपणा केला आणि चांगलाच नडला

Subscribe

दिवे लावण्याऐवजी तोंडातून आगीचे लोळ काढणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ९ वाजता ९ मिनिटे लाइट्स बंद करुन दरवाजात किंवा बाल्कनीमध्ये उभे राहून मेणबत्ती, दिवा, टॉर्च, मोबाईलचा फ्लॅश लावण्यास सांगितले. याला सर्वांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला. मात्र, काही अतिउत्साही लोकांना हा शहाणपणा चांगलाच नडला. एका तरुणाने दिवे लावण्याऐजवी तोंडात रॉकेल धरुन आगीचे लोळ काढले. पण हा त्याचा शहाणपणा त्याला भलताच नडला.

नेमके काय घडले?

मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरातील एका तरुणाने दिवे लावण्याऐवजी तोंडात आगीचे लोळ काढत कलाबाजी करत होता. त्यांनी पहिल्यांदा लोळ व्यवस्थित काढले. मात्र, दुसऱ्यांदा पुन्हा त्यांनी तोच प्रकार केला आणि तो त्याच्या चांगलाच अंगलट आला. त्यांनी दुसऱ्यांदा लोळ काढण्याचा प्रयत्न केला आणि ती आग त्याच्या तोंडाला लागली. ही घटना पाहून शेजारच्या लोकांनी धाव घेतली आणि त्या युवकाला वाचवले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार; रविवारी रात्री ९ वाजता परिसरातील लोक दीप प्रज्वलित करत होते. यावेळी गाबी हनुमान मंदिराजवळ राहणारा एक तरुण भर रस्त्यात आला आणि त्यांनी तोंडातून आगीचे लोळ काढण्यास सुरुवात केली. अचानक त्याच्या तोंडाला आग लागली आणि परिसरात एकच गोंधळ झाला. नंतर लोकांनी पाणी घालून त्या तरुणाचा बचाव केला.

- Advertisement -

उज्जैन शहर पूर्णपणे बंद

आजपासून उज्जैन शहर तीन दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. याठिकाणी तीन दिवस किराणा स्टोअर्स देखील बंद ठेवण्यात आली आहेत. तर अत्यावश्यक सेवांची होम डिलीव्हरी होईल. तसेच जारी केलेल्या आदेशानुसार किराणा, फळे, भाज्या, दूध, डेअरी आणि एलपीजी एजन्सीची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. या वस्तूंची होम एक्सेस सर्व्हिस सुरू राहील आणि ते रात्री ८ वाजेपर्यंत दररोज ऑपरेट करू शकतील. मात्र, प्रत्येक सेक्टरसाठी निवडलेली औषधांची दुकाने दिवसाचे २४ तास खुली असतील.


हेही वाचा – औरंगाबाद : लाइट बंद होताच केली दगडफेक; महिला जखमी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -