घरदेश-विदेशमोदी तुमचे 'आजी-आजोबा' इंग्रजांसोबत होते- कपिल सिब्बल

मोदी तुमचे ‘आजी-आजोबा’ इंग्रजांसोबत होते- कपिल सिब्बल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात ‘राहुल गांधी यांच्या आजी-आजोबांनी छत्तीसगडमध्ये पाण्यासाठी पाईपलाइन टाकली होती का?’ असा प्रश्न विचारला होता. मोदींच्या या प्रश्नाला काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. ‘हिराकूड धरण, सरदार सरोवर धरण आणि भाकरा धरण कोणी बांधले होते?’ असा उलट प्रश्न सिब्बल यांनी मोदींना केला आहे. तुमच्या पक्षातील ‘आजी-आजोबा’ इंग्रजांसोबत होते आणि त्यांनी इंग्रजांशी हातमिळवणीही केली पण तुम्हाला याविषयी ठाऊक नसावं, अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे. छत्तीसगडमध्ये नुकत्याच झालेल्या सभेदरम्यान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर टीका केली होती. ‘गरीबी हटाव’ असा नारा इंदिरा गांधींनी दिला होता पण देशातील माहिती गरीब कामं झाली आहे का? असा सवाल मोदी यांनी यावेळी उपस्थित केला होता. तसंच तुमच्या आजी-आजोबांनी छत्तीसगडमध्ये पाण्यासाठी पाईपलाइन टाकली होती का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला होता. मोदींनी काँग्रेसवर केलेल्या या घणाघाती टीकेवर राजकीय वर्तुळातून काही प्रत्युत्तर येणार का यांची अनेकजण प्रतिक्षा करत होते.

- Advertisement -

अखेर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी याच मुद्यावरुन पंतप्रधान मोदींना स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. कपिल सिब्बल यांनी शनिवारी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन एक ट्वीट केलं आणि त्याद्वारे मोदींना हा थेट सवाल केला. ‘तुमच्या आजी-आजोबांनी छत्तीसगडमध्ये पाईपलाइन टाकली होती का? असा सवाल मोदींजींनी राहुल गांधी यांना केला होता. मग मोदीजी तुम्ही तरुण असताना रेल्वे स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मवर पाणी कुठून यायचं. नेहरू यांनी आधुनिक औद्योगिक भारताची पायाभरणी केली. मग तुमच्या पक्षातील आजी-आजोबांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती’, अशाप्रकारचं वक्तव्य सिब्बल यांनी त्यांच्या ट्वीटमधून केलं आहे. दरम्यान कपिल सिब्बल यांच्या या ट्वीटमुळे पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेस पक्ष आमने-सामने आले आहेत.

काँग्रेसला भांडणं लावल्याशिवाय चैन पडत नाही…

छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि गांधी घराण्यावर निशाणा साधला होता. यावेळी ‘काँग्रेसला भावाभावांमध्ये भांडणं लावल्याशिवाय चैन पडत नाही’, अशी टीकाही मोदी यांनी केली. याशिवाय ‘नेहरुंमुळे चहावाला पंतप्रधान बनला अशी चर्चा लोक करत आहेत. मात्र, असं असेल तर गांधी घराण्याबाहेरच्या एखाद्या निष्ठावान कार्यर्त्याला पाच वर्षांसाठी पक्षाचा अध्यक्ष करा’, असं आवाहनही मोदींनी काँग्रेसला दिलं होतं.


वाचा: कायद्याने राममंदिर बांधा; अनथ्या… काय म्हणाले रामदेव बाबा?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -