बऱ्याच काळापासून अभिनेत्री अनुप्रिया गोएंका बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये Active आहे. अभिनेत्री अनुप्रिया गोएंकाने पद्मावत, टायगर जिंदा है, वॉर अशा चित्रपटांमध्ये आपली दमदार भूमिका निभावली आहे. तसेच तिने चित्रपटाव्यतिरिक्त सेक्रेड गेम्स आणि आश्रम वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आश्रम या वेबसीरिजमधल्या अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. वयाच्या १८व्या वर्षी तिच्यासोबत एक वाईट घटना घडली होती. एका आध्यात्मिक गुरुने तिच्यासोबत वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता, असा अनुप्रियाने खुलासा केला आहे.
View this post on Instagram
Challenge accepted @ek_ek_ekoo @smritikiran 🖤🖤 #Womenforwomen #sisterhood
ई टाईम्सशी बोलताना अनुप्रियाने सांगितले, ‘तिचे वडील खूप आध्यात्मिक होते. त्यांचा बाबा आणि तांत्रिक गोष्टींवर विश्वास होता. यामुळे कुटुंबियांना खूप नुकसान झाले. प्रत्येकाला एका कठीण परिस्थित उभे केलं होते. तिच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर खूप विश्वास ठेवला होता.’
याबाबत ती म्हणाली की, ‘माझ्या कुटुंबियांचा या गोष्टींवर खूप विश्वास ठेवला होता. मी पण या गोष्टींवर विश्वास ठेवू लागले. त्यांचं बोलणं सत्य आणि योग्य वाटू लागली. ते मला खूप प्रॅक्टिकल वाटत होते. पण त्यांनी माझा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी १८ वर्षांची होती. त्यांनी मला बऱ्याच काळ घाबरवले. नशीब मी त्यांना फायदा उचालायला दिला नाही.’
पुढे अनुप्रिया म्हणाली की, ‘मी तेव्हा वाचण्यासाठी सक्षम होती. मला माझ्या मनाचं ऐकायचं आहे, हे मला माहित होते. फक्त काही दिवसांसाठी मला त्यांच्यासोबत लढायचे होते. मी त्या परिस्थितीतून वाचले होते.’