घरमनोरंजनबायोपिकनंतर मोदींवरील वेबसिरीजलाही स्थगिती

बायोपिकनंतर मोदींवरील वेबसिरीजलाही स्थगिती

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकपाठोपाठ मोदी यांच्या आयुष्यावर ‘मोदी जर्नी ऑफ कॉंमन मॅन’ ही सुरू झालेली वेबसिरीज बंद करण्यात आली आहे. ही वेब सिरीज एकूण १० भागांची होती.

गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान असा नरेंद्र मोदी यांचा प्रवास या वेबसीरीजमधून उलगडला जाणार आहे. दिग्दर्शक उमेश शुक्ला ‘मोदी’ वेब सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी शुक्ला यांनी ‘ओह माय गॉड’ आणि ‘102 नॉट आऊट’चं दिग्दर्शन केलं आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावरील पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शानावरचे ग्रहण काही दूर होताना दिसत नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. आता ‘मोदी जर्नी ऑफ कॉंमन मॅन’ या वेबसिरीजचेही प्रदर्शन थांबवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक असलेल्या या चित्रपटात अभिनेता विवेक ऑबेरॉय याने प्रमुख भूमिका साकारली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -