अगं ऐकलस का!… नाटक ओम स्वह: आहे

Mumbai
Marathi drama

अगं ऐकलस का! हे आपुलकीच वाक्य घरातल्या सदस्यांसाठी फारफार तर जिवलग मैत्रिणीसाठी वापरले जाते. विनायक कावळे, गौरी लवाटे लिखित ओम (अंकूर काकतकर) दिग्दर्शित नव्याने रंग़मंचावर आलेल्या नाटकाचे नाव ‘अगं ऐकलस का!’ असे आहे. या नाटकात काकीची भूमिका जिचे सूनबाईवर अधिकारवाणीने बोलणे आहे, तिच्या तोंडी हे वाक्य अनेकवेळा दिलेले आहे. या वाक्यात आपुलकी, आपलेपणा असला तरी प्रत्यक्षात मात्र टोमणा आणि खुळचटवृत्तीने बोलले जात आहे. त्याला कारण म्हणजे रजनी ही या नाटकाची नायिका आहे. पती प्रदिपवर तिचे मनापासून प्रेम आहे पण ज्या हेतुने तीने त्याच्याबरोबर लग्न केले त्याची पूर्तता होत नाही त्याने ती कासावीस झालेली आहे. मैत्रिणीमात्र परदेशात मौजमजा करतात, निदान लोणावळ्याला जावून आम्हीही जीवनाचा आनंद घेतो जे तिला आपल्या मैत्रिणींना दाखवायचे असते.

त्यासाठी काहीही कर पण लोणावळ्याला जावूच असा तगादा पतीजवळ लावते. तसं तो जुळवूनही आणतो पण अनपेक्षीतपणे विधवा काकी घरात दाखल होते. वास्तव्य करण्याची तयारी दाखवते. त्यामुळे या जोडप्याची निराशा होते. काकी अधिकारवाणीने सुनेकडून बर्याच गोष्टी करवून घेते. त्यातही रजनीची दमछाक होते. एकत्र कुटुंबापेक्षा विभक्त कुटुंब बरे असे मैत्रिणीकडून सुचवले जाते. या त्रागात, भांडणात , समज-गैरसमज उद्भवलेले असताना रजनी अलिप्त घराची कल्पना मांडते. नंतर मात्र या कथेचा शेवट उत्तम झाल्याचे दाखवलेले आहे. खडूस वागणार्या काकीला आई म्हणून स्वीकारते. हा बदल नेमका का आणि कसा घडतो हे संपूर्ण नाटक पाहिल्यानंतर उलगडायला लागतो.

आजचे नाटक हे फक्त कथेला, त्यातल्या कलाकारांना प्राधान्य देणारे न राहता नेपथ्य, त्यातील संगीत, प्रकाश योजनासुद्धा नाटकाला पुरक कशी ठरेल यादृष्टीने प्रयत्न केला जातो. दिग्दर्शक ओम यांनी तांत्रिकबाजूकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून लक्ष केंद्रित केलेले नाही. विनोद राठोड, उल्हास सुर्वे, साई पियुष यांनीही तांत्रिकबाजू सांभाळलेली आहे. विनायक, गौरी यांनी कौटुंबीक पार्श्वभूमी घेऊन या नाटकाचे लेखन केलेले आहे. खरंतर आजचे कौटुंबीक जीवन पूर्णपणे बदललेले आहे. त्यातली भाषाशैली आणि विचार करण्याचा दृष्टिकोन थोडा व्यापक झालेला आहे. त्याचे अचूक दर्शन घडायला हवे. पहिल्या अंकात प्रेक्षकांना ताब्यात घेण्यासाठी लेखन आणि प्रसंग यांचा जो समन्वय साधायला हवा तो साधला जात नाही, त्यामानाने दुसरा अंक प्रेक्षकांचे छान मनोरंजन करून जातो.

मोरया एलिट एण्टरटेंटमेंट आणि व्ही. आर. प्रोडक्शन यांची ही प्रस्तूती असून शशिकांत जाधव, कुणाल मराठे, आशिष लवाटे, मनोज पाटील यांनी या नाटकाची निर्मिती केलेली आहे. रजनीची मुख्य व्यक्तीरेखा गितांजली गणगे हिने मध्यवर्ती भुमिका केललेली आहे . वुशय गंभीर असल्यामुळे तिच्या बाबबतीत विनोदी संवादाला फारसा थारा नाही.लेखकाने लिहिलेले संवाद आणि अभिनय ही या भुमिकेची मुख्य गरज आहे. तिने तिच्या पद्धतिने साकाकर केलेली आहे.प्रदिप झालेला आशुतोष कुलकर्णी याच्याबाबतितही हेच सांगता येईल. यात सर्वात जास्त लक्षात राहते ती काकीची व्यक्तीरेखा साकार करणारी सिद्धीरुपा करमरकर.

मध्यंतरानंतर प्रेक्षकांत जो हस्य खळखळाट ऐकायला मिळतो ति तिच्या भुमिकेची कमाल म्हणावी लागेल. सुदेश म्हशिलकर हा बाबच्या भुमिकेत दिसतो तसा तो भुमिकेची समज असलेला कलाकार आहे. प्रेक्षकांनी दखल घ्यावी असं त्याच्या भुमिकेत फारसं काही जाणवत नाही. त्याच्या भुमिकेचा अजून व्यापकतेने वापर व्हायला हवा होता असे वाटते. चित्रा कुलकर्णी, सोनाली मगर, यांचा सुद्धा या नाटकात कलाकार म्हणून सहभाग आहे. नाटकाचा विषय त्याचे सादरीकरण लत्रात घेता, अग ऐकलेस का.. ओम स्वह: असं म्हणाव असं हे नाटक आहे.

-नंदकुमार पाटील

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here