घरमनोरंजनबिग बींनी इंस्टाग्रामवर शेअर केला 'या' अभिनेत्रीचा बालपणातील फोटो

बिग बींनी इंस्टाग्रामवर शेअर केला ‘या’ अभिनेत्रीचा बालपणातील फोटो

Subscribe

नुकताच त्यांनी एक जुना फोटो त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. ज्यामध्ये बॉलिवूडमधील सध्याची प्रसिद्ध अभिनेत्री दिसतेय.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या चित्रपटांबद्दल सक्रीय असतात तेवढेच ते सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. अमिताभ बच्चन आपल्या चाहत्यांबरोबर लहान-मोठ्या गोष्टी शेअर करत असतात. ट्विटरवर अनेक ट्वीट करताना दिसतात. तर दुसरीकडे अनेकदा इंस्टाग्रामवरही ते वेगेवगळे फोटो शेअर करताना दिसतात.

- Advertisement -

नुकताच त्यांनी एक जुना फोटो त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. ज्यामध्ये बॉलिवूडमधील सध्याची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर दिसतेय. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुकार’ चित्रपटाच्या सेटवरील हा फोटो अमिताभ यांनी शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

अमिताभ यांनी हा फोटो शेअर करताना लिहिलं, ‘ओळखा पाहू कोण आहे ही मुलगी ? गोवा मध्ये ‘पुकार’ चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी सेटवर उपस्थित असलेली ही बेबी गर्ल करीना कपूर आहे. यावेळी ती तिच्या वडीलांसह रणधीर कपूर यांच्यासोबत आली होती. शुटिंग दरम्यान अचानक तिच्या पायांना दुखापत झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -