‘सर, आता तुम्ही म्हातारे झाले आहात’, ‘त्या’ फोटोवर नेटकऱ्यांनी दिले भन्नाट रिप्लाय!

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या फोटोवरून नेटकऱ्यांनी अनेक सल्ले दिले आहेत.

Mumbai
Amitabh Bachchan has been trolling as he has wish marathi day late
अमिताभ बच्चन

५ जानेवारीला रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनीटं घरातील सगळे लाईट बंद करून दिवा, मेणबत्ती लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदींच्या आवाहनाला देशातील नागरिकांनी मोठ्या प्रामाणावर प्रतिसाद दिला. यावेळी सेलेब्रेटींनीही मोदींच्या आवाहनाला साथ दिली. कलाकारांनी दिवे लावतानाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. यावेळी बीग बी यांनी केलेल्या शेअर केलेल्या फोटोमुळे अमिताभ बच्चन यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

तो फोटो शेअर केला आणि…

अमिताभ बच्चन यांनी पृथ्वीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत पृथ्वीवर भारताचा नकाशा दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. या फोटोला त्यांनी हे जग आपल्याला पाहत आहे. आपण सगळे एक आहोत, असं कॅप्शन दिलं होतं. हा फोटो अनेकांनी नासाने अंतराळातून काढलेला फोटो म्हणून शेअर केला होता.  मात्र हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

नेटकऱ्यांचे भन्नाट रिप्लाय…

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या फोटोवरून नेटकऱ्यांनी अनेक सल्ले दिले आहेत. कोणी म्हणतय.. अमिताभ बच्चन म्हातारे झाले आहेत.. तर कोणी म्हणतं अमिताभ बच्चन यांच्याकडून मोबाईल काढून घ्या…तर कोणी व्हॉट्सअप डिलीट करण्याचा सल्ला दिला.