घरमनोरंजनबिग बींचे सेक्रेटरी शीतल जैन यांचे निधन

बिग बींचे सेक्रेटरी शीतल जैन यांचे निधन

Subscribe

बिग बी अमिताभ बच्चन यांचे सेक्रेटरी शीतल जैन यांचे आज निधन झाले आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे सेक्रेटरी शीतल जैन यांचे आज निधन झाले आहे. शीतल जैन यांनी ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून ते बिग बी अमिताभ बच्चन यांची सावली सारखी पाठराखण केली असून ते गेले ३५ वर्ष अमिताभ बच्चन यांचे सेक्रेटरी होते.

शीतल जैन यांच्याविषयी थोडक्यात

अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरची सुरुवात ही बॉलिवूडमधून केली. तेव्हापासून शीतल जैन त्यांच्यासोबत होते. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी अमिताभ बच्चन यांचे सेक्रेटरी म्हणून काम केले होते. शीतल जैन यांच्या निधनावर महानायक अमिताभ बच्चन यांनी शोक व्यक्त केला आहे. तर अभिनेता अनुपम खेर यांनीही ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

- Advertisement -

अभिनेता अनुपम खेर यांनीही वाहिली श्रद्धांजली.

- Advertisement -

खूप नम्र, मृदू स्वभावाचे होते

शीतल जैन हे खूप नम्र आणि मृदू स्वभावाचे होते. तसेच ते दयाळू देखील होते, असे म्हणत प्रसिद्ध दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनी ट्विटरवरून शीतल जैन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

एक चांगला मित्र गमावला

आज चित्रपट सृष्टीतील एक चांगला मित्र गमावला आहे. तसेच शीतल जैन हे अतिशय नम्र स्वभावाचे होते, अशी प्रतिक्रिया देत सुभाष घई यांनी देखील ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.


हेही वाचा – त्या ट्विटवरून अमिताभ बच्चन यांचा विवेक ऑबेरॉयला चिमटा?

हेही वाचा – चुकलंच! पंतप्रधानपदी अमिताभ बच्चन यांना निवडून द्यायला हवं होतं – प्रियंका गांधी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -