कपूर भावंडांचा फॅमिली ग्रुप चॅटचा स्क्रीनशॉट झाला व्हायरल

बॉलीवूडचा अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याच्या कुटुंबाचा व्हॉट्सॅप फॅमिली ग्रुपवरील संवादाचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे.

Mumbai

ज्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिक व्हॉट्सॅप वरुन आपल्या परिचितांशी संवाद साधतात. अगदी त्याचप्रमाणे बॉलीवूडचे स्टार्सदेखील आपल्या परिचितांशी संवाद साधण्यासाठी व्हॉट्सॅपचा वापर करतात. बॉलीवूडमधील स्टार मंडळी आपल्या कुटुंबियांशी, मित्रमंडळींसोबत व्हॉट्सॅपवर काय बातचीत करतात? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमीच सतावतो.

त्यातच आता बॉलीवूडचा अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याच्या कुटुंबाचा व्हॉट्सॅप फॅमिली ग्रुपवरील संवादाचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. या ग्रुपमध्ये जान्हवी कपूर, बोनी कपूर, अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर एकमेकांसोबत संवाद साधत आहेत.

अर्जुनची बहीण अंशुला हिने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. कुटुंबातील सर्वजण आपल्या फ्लाइट विषयी एकमेकांना माहिती देत असल्याचे या स्क्रीनशॉटमध्ये पहायला मिळते.

दरम्यान बोनी कपूर यांचा आज जन्मदिवस आहे. या दिनानिमित्त जान्हवी कपूर हिने वडील बोनी कपूर यांच्यासोबतचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. हे पोस्ट शेअर करताना जान्हवीने एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे.