‘एण्डगेम’फेम स्कार्लेट वर्षाला कमावते ४०० कोटी!

'अॅव्हेंजर्स एण्डगेम'मधील ब्लॅक विडो अर्थात स्कार्लेट जॉन्सनची वर्षाची कमाई ४०० कोटी असल्याचं समोर आलं आहे. फोर्ब्सने जगातल्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीमध्ये स्कार्लेटला सर्वात वरचं स्थान दिलं आहे.

Mumbai
Scarlett Johansson
Photo by David Fisher

जगभरात कोट्यवधी चाहते असणारी अभिनेत्री स्कार्लेट जॉन्सनची वर्षाची कमाई देखील कोट्यवधींमध्येच आहे. आणि थोडे-थोडके नव्हे, तर वर्षाला स्कार्लेटबाई कमावतात चक्क ४०० कोटी रुपये! फोर्ब्सनं नुकतीच सर्वाधिक कमाई असणाऱ्या ‘टॉप टेन’ अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी स्कार्लेटनं ‘टॉप’ केलंय. अवघ्या ३४व्या वर्षी स्कार्लेटची ही करोडोंची उलाढाल इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय न ठरती, तरच नवलं!

View this post on Instagram

Blackwidow ❤️ @scarlett.johansson.fc ♥️ ▫️ ▫️ #scarlettjohanssonfc ▫️ ▫️ ▫️ #scarlettjohansson ▫️ ▫️ ▫️ ▫️ ▫️ ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ ♦️Get Daily Updates of Scarlett ♦️ Link in Bio to get featured ❤️Follow My World & support 💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛 ⤵️⤵️Check out this page too⤵️⤵️ ▫️ 👉 @alexandra.daddario.fc ♥️🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹♥️ . . . . . . [ #elizabetholsen #chrisevans #chrishemsworth #jeremyrenner #robertdowneyjr #sebastianstan #markruffalo #cateblanchett #tomhiddleston #zoesaldana #natasharomanoff #blackwidow #wandamaximoff #scarletwitch #brielarson #chrispratt #karengillan #natalieportman #hayleyatwell #evangelinelilly #cobiesmulders #natasharomanova #theotherboleyngirl #Avengers4 #Avengersendgame #captainmarvel #ghostintheshell ]

A post shared by Scarlett Johansson 🇺🇸 (@scarlett.johansson.fc) on

‘एण्डगेम’मधली ब्लॅक विडो आठवतेय का?

डिसने मार्व्हल्स स्टुडिओच्या अॅव्हेंजर्स एण्डगेममध्ये स्कार्लेटनं निभावलेली नताशा रोमनॉफ किंवा ब्लॅक विडो ही व्यक्तीरेखा चांगलीच गाजली. प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलेल्या या चित्रपटानं याआधीचे अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढत जगभरातल्या सिनेमा वर्तुळामध्ये कोट्यवधी डॉलर्सची कमाई केली आहे. याच सिनेमामुळे स्कार्लेटची कमाई देखील ४०० कोटींच्या घरात पोहोचली आहे. १ जून २०१८ ते १ जून २०१९ या वर्षभरात स्कार्लेटनं ही ४०० कोटींची झेप घेतली आहे.

View this post on Instagram

Left or right ? 👉 @scarlett.johansson.fc ♥️ ▫️ ▫️ #scarlettjohanssonfc ▫️ ▫️ ▫️ #scarlettjohansson ▫️ ▫️ ▫️ ▫️ ▫️ ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ ♦️Get Daily Updates of Scarlett ♦️ Link in Bio to get featured ❤️Follow My World & support 💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛 ⤵️⤵️Check out this page too⤵️⤵️ ▫️ 👉 @alexandra.daddario.fc ♥️🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹♥️ . . . . . . [ #elizabetholsen #chrisevans #chrishemsworth #jeremyrenner #robertdowneyjr #sebastianstan #markruffalo #cateblanchett #tomhiddleston #zoesaldana #natasharomanoff #blackwidow #wandamaximoff #scarletwitch #brielarson #chrispratt #karengillan #natalieportman #hayleyatwell #evangelinelilly #cobiesmulders #natasharomanova #theotherboleyngirl #Avengers4 #Avengersendgame #captainmarvel #ghostintheshell ]

A post shared by Scarlett Johansson 🇺🇸 (@scarlett.johansson.fc) on

पहिल्या १०मध्ये एकही भारतीय नाही!

दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री देखील फोर्ब्समध्ये येण्याची चर्चा सुरू झाली होती. इतकंच काय, फक्त टॉप टेनच नव्हे, तर दीपिका किंवा प्रियंका या यादीमध्ये थेट टॉप देखील करतील असं म्हटलं जात होतं. पण स्कार्लेटनं या दोघींना बरंच मागे पाडलं आहे.

स्कार्लेटच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर मॉडर्न फॅमिली फेम सोफिया वर्गेरा आहे. तर बिग लिटल लायज फेम अभिनेत्री रीसे विदरस्पून आणि निकोल किडमन या दोघींनी अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. पहिल्या १०मध्ये एकाही भारतीय अभिनेत्रीला स्थान मिळवता आलं नसलं, तरी एण्डगेममुळे स्कार्लेट भारतात इतकी फेमस झाली आहे, की तिला अर्धीअधिक भारतीयच म्हणायला हरकत काय आहे!

View this post on Instagram

Left or right ? 👉 @scarlett.johansson.fc ♥️ ▫️ ▫️ #scarlettjohanssonfc ▫️ ▫️ ▫️ #scarlettjohansson ▫️ ▫️ ▫️ ▫️ ▫️ ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ ♦️Get Daily Updates of Scarlett ♦️ Link in Bio to get featured ❤️Follow My World & support 💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛 ⤵️⤵️Check out this page too⤵️⤵️ ▫️ 👉 @alexandra.daddario.fc . . . . . . .• • [ #elizabetholsen #chrisevans #chrishemsworth #jeremyrenner #robertdowneyjr #sebastianstan #markruffalo #cateblanchett #tomhiddleston #zoesaldana #natasharomanoff #blackwidow #wandamaximoff #scarletwitch #brielarson #chrispratt #karengillan #natalieportman #hayleyatwell #evangelinelilly #cobiesmulders #natasharomanova #theotherboleyngirl #Avengers4 #Avengersendgame #captainmarvel #ghostintheshell #scarlettjohanssonfc ▫️ ]

A post shared by Scarlett Johansson 🇺🇸 (@scarlett.johansson.fc) on