सुरेश वाडकरांचा सुरेख लूक

Mumbai
Suresh Wadkar

हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गायक म्हणून सुरेश वाडकरांचे आदराने नाव घेतले जाते. संगीताची त्यांना जबरदस्त समज आहे. त्यामुळे रिअ‍ॅलिटी शो मध्येही परीक्षक या नात्याने ते अनेक वेळा प्रेक्षकांच्या समोर आलेले आहेत. सदरा-लेंगा हा त्यांचा पेहराव असला तरी रिअ‍ॅलिटी शो आणि महासोहळे यांची गरज लक्षात घेऊन कपड्यामध्येसुद्धा त्यांनी बराचसा बदल केलेला आहे. वेगवेगळ्या कलाकुसरीचे, रंगांचे जॅकेट परिधान करणे त्यांना आवडू लागलेले आहे. गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा संगीताचा प्रवास लक्षात घेतला तर नैसर्गिकरित्या व्यक्तिमत्त्वात जे बदल होत गेले, ते त्यांनी स्वीकारलेले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत ज्या प्रेक्षकांनी त्यांना पाहिले त्यात पूर्णपणे विरळ केसांचे सुरेश वाडकर दिसलेले आहेत. सुरेश वाडकरांचा सुरेख लूक असे म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांनी केसांचा टोप वापरणे सुरू केलेले आहे. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिकच खुलून दिसायला लागलेले आहे.

स्टार प्रवाहने ‘आनंदयात्री’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाडकर यांना निमंत्रित केले होते. सुधीर फडके यांच्या आठवणी आणि सोबतीला त्यांची गाणी असे त्याचे स्वरुप होते. वाडकर रंगमंचावर दाखल झाले ते या नव्या लूकसोबत जो प्रेक्षकांमध्ये कुजबूज करणारा ठरला. वाडकरांचे छोटे बंधू तर नाहीत ना अशी काहीशी प्रतिक्रिया कुजबुजीत ऐकायला मिळाली. प्रदीर्घ कालावधीनंतर वाडकर हे ‘सांज ढले’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज बोरिवलीकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बॅनरबाजीत केले गेलेले त्यांचे जुने रुप जरी दिसत असले तरी या कार्यक्रमात मात्र वाडकरांचा नवा लूक प्रथमच पहायला मिळणार आहे. प्रबोधन ठाकरे इथे होणार्‍या या कार्यक्रमात अर्चना गोरे, विद्या निषाद यांचा सहगायिका म्हणून सहभाग आहे. संजय मराठे यांच्या संगीत संयोजनात हा कार्यक्रम होणार असून अनुश्री फडणीस त्याचे निवेदन करणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here