घरमनोरंजनअभिजीत बिचुकले घरामध्ये परतणार!

अभिजीत बिचुकले घरामध्ये परतणार!

Subscribe

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिजीत बिचुकलेंची एंट्री होणार आहे. 'अगर मैने एकबार कमिटमेंट करली तो मै खुदा किभी नाही सुनता' या शब्दांत अभिजीत बिचूकलेंनी घरामध्ये एंट्री घेतली आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल माधव देवचके बाहेर पडले आणि त्यांना दिलेल्या विशेष अधिकाराने त्याने नेहाला पुढील आठवड्यासाठी सेफ केले आहे. मात्र, माधवच्या जाण्याने नेहा आणि शिवानीला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या जाण्याने आता नेहा आणि शिवानीची काय योजना असेल? हे बघणे रंजक असणार आहे. या आठवड्यामध्ये सदस्यांवर बिग बॉस कोण कोणते टास्क सोपवणार? कोण घराचा नवा कॅप्टन बनणार? कोण कोणाला नॉमिनेट करणार? हे बघणे रंजक ठरणार आहे.

बिचुकलेंची योजना काय असणार?

बिग बॉसच्या घरातून सदस्य अभिजीत बिचुलके यांना अटक करण्यात आली होती. साताऱ्यात चेक बाऊन्सप्रकरणी सातारा पोलिसांनी अभिजीतला बेड्या घातल्या होत्या. बिग बॉसच्या घरात जाऊन अभिजीतला आरे पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसांनी अटक केली होती. मात्र, प्रेक्षक ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आला असून आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिजीत बिचुकलेंची एंट्री होणार आहे. ‘अगर मैने एकबार कमिटमेंट करली तो मै खुदा किभी नाही सुनता’ या शब्दांत अभिजीत बिचूकलेंनी घरामध्ये एंट्री घेतली आहे. अभिजीत बिचुकलेंच्या एंट्रीने घरातील समीकरणं नक्कीच बदलणार आहे. घरामध्ये आता नवीन ग्रुप तयार झाले असून, नवी नाती तयार झाली आहेत. या सगळ्यामध्ये बिचुकलेंची योजना काय असेल ते कोणत्या ग्रुपमध्ये जातील? कि ते त्यांचाच स्वतंत्र ग्रुप तयार करतील? कि वैयक्तिक खेळतील हे कळणारच आहे. पण त्यांच्या येण्याने खेळाला नवी रंगत येणार हे निश्चित आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -