सिंघम गर्ल ‘या’ उद्योगपतीसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार

सिंघम गर्ल 'या' उद्योगपतीसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार

साउथ इंडियन फिल्ममधील सुपरस्टार आणि ‘सिंघम’मधील अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. याबाबत स्वतः काजल अग्रवालने पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. काजल अग्रवालने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, ‘या महिन्यात ३० तारीखला गौतम किचलूसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. या लग्न सोहळ्यात फक्त कुटुंबातील सदस्यांचा समावेश असेल. तसेच लग्न झाल्यानंतरही ती पुढे काम सुरू ठेवणार आहे आणि चाहत्याचे मनोरंजन करत राहणार आहे.’ काजलने काही तासांपूर्वी पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांच्या भरपूर प्रतिसाद येत आहे.

View this post on Instagram

♾🙏🏻

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

नक्की काय लिहिले आहे काजलने पोस्टमध्ये

‘मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, मी गौतम किचलू याच्याशी ३० ऑक्टोबर २०२० ला मुंबईत लग्न करत आहे,  या लग्न सोहळ्यात फक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित असतील. या महामारीमुळे आपल्या आयुष्यावर खूप परिणाम झाला. परंतु आम्ही एकत्र आपले जीवन सुरू करण्यास तयार आहोत आणि आम्हाला ठाऊक आहे तुम्ही देखील आम्हाला साथ द्याल. मी तुमच्या लोकांचे धन्यवाद मानते. इतक्या दिवसांपूर्वी तुम्ही मला खूप प्रेम दिले आणि आशीर्वाद दिला. तसेच आता आम्ही नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत, त्यामुळे तुमच्या प्रार्थनेची खूप गरज आहे. मी जे आतापर्यंत करत आली आहे, ते मी पुढे करत राहीन’, असे काजलने लिहिले आहे. सध्या काजलच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

काजल अग्रवालने ‘क्यूं! हो गया ना…’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडच्या दुनियेत पदार्पण केले. याशिवाय ‘सिंघम’, ‘स्पेशल २६’ आणि ‘खिलाडी नंबर १५०’ या चित्रपटात तिने काम केले आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त काजलने तामिळ, तेलुगू या चित्रपटांमध्ये जबरदस्त काम केले आहे. माहितीनुसार, लॉकडाऊननंतर धुमधडाक्यात पार पडणारे हे पहिले सेलिब्रिटी लग्न असेल. काजलचा होणार नवरा एक उद्योगपती, इंटिरिअर डिझायनर आहे.