सलमानच्या ड्रायव्हर आणि दोन स्टाफला कोरोनाची लागण

bollywood actor salman khan isolates himself after his personal driver two staffers tested covid-19 positive
सलमानच्या ड्रायव्हर आणि दोन स्टाफला कोरोनाची लागण

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या ड्रायव्हरसह दोन स्टाफला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सलमान खानने स्वतःला आयसोलेटेड केले आहे. सलमान सध्या कलर्सवरील लोकप्रिय ‘बिग बॉस-१४’ शो होस्ट करत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आता सलमान ‘बिग बॉस-१४’च्या येणाऱ्या एपिसोडमध्ये असेल की नाही ते पाहावे लागेल.

दरम्यान अलीकडेच सलमान खानचा ‘राधे’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री दिशा पटानी दिसणार आहे. या सर्वांच्या दरम्यान सलमान बिग बॉस सीझन १४मध्ये होस्टच्या रुपातही परत आला आहे. पण आता ड्रायव्हर आणि दोन स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सलमान बिग बॉसमध्ये होस्टिंग करणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी २-३ महिन्यांनंतर कामाला सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाची शूटिंग बंद होती. सध्या कोरोना कहर कायम आहे. कोरोनाचा धोका हा फक्त मनोरंजन क्षेत्रावर नाही तर पूर्ण देशावर आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १७ लाख पार झाली असून १७ लाख ५७ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ४६ हजार २००हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ८० हजार २२१ Active केसेस आहेत आणि १६ लाख ३० हजार ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ७१ हजार ५००हून अधिक आहे आणि १० हजार ६१५ जणांचाम मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Video: ब्रेकअपनंतर टायगरची बहीण करतेय Chill!