Video: लॉकडाऊनमध्ये मलायका अरोराचा डान्स व्हिडिओ व्हायरल!

Mumbai
bollywood actress malaika arora dancing on beach actress video viral on internet
Video: लॉकडाऊनमध्ये मलायका अरोराचा डान्स व्हिडिओ व्हायरल!

बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते. चाहत्यांसोबत कनेक्ट राहणाऱ्यासाठी मलायका आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मलायकाचे फोटो असो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. अलीकडे तिने शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

Find ur sanity in these insane times …..#stayhomestaysafe

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

या व्हिडिओमध्ये मलायका समुद्र किनारी डान्स करताना दिसत आहे. यामध्ये तिने व्हाइट बिकिनी घातली आहे आणि ती समुद्र किनारी एन्जॉय करता आहे. आतपर्यंत या व्हिडिओला ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एका युजर्सने हा डान्स व्हिडिओ पाहून अर्जुन कुठे आहे? तर दुसऱ्याने मॅडम तुम्हाला चक्कर येईल? अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मलायका तिच्या फोटो आणि व्हिडिओ व्यतिरिक्त अर्जुन कपूर सोबतच्या असलेल्या रिलेशनशिपमुळे देखील चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरच्या चाहत्यांने तो मलायकासोबत लग्नाच्या संबंधी प्रश्न विचारला होता. तेव्हा अर्जुनने उत्तर दिले की, ‘जेव्हा मी लग्न करेन तेव्हा मी तुम्हाला सर्वांना सांगेन. सध्या कोणताही प्लॅन नाही. जरी आमचे आता लग्न करायचे ठरले तरी ते कसे करायचे? याबद्दल विचार केला गेला नाही.’


हेही वाचा – Video: रितेशचा ‘हा’ व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण, म्हणाले ‘भावा टिकटॉक डिलीट कर’


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here