समोर आईला बघताच जान्हवी कपूर झाली इमोशनल!

२० तज्ज्ञांनी मिळून श्रीदेवींचा मेणाचा पुतळा तयार केला आहे. हा पुतळा तयार करण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला

singapure
janhvi kapoor

बॉलिवूडची हवाहवाई गर्ल दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयातील मेणाच्या पुताळ्याचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. श्रीदेवींच्या वाढदिवसाच्या दिवशी १३ ऑगस्ट रोजी मेणाचा पु्तळा तयार करणार असल्याची घोषणा केली होती. आज अखेर या पुतळ्यावरील पडदा उचलण्यात आला. या पुतळ्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर, दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी उपस्थित होत्या. हा मेणाचा पुतळा सर्वांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. दरम्यान श्रीदेवींच्या पुतळ्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

२० तज्ज्ञांनी मिळून श्रीदेवींचा मेणाचा पुतळा तयार केला आहे. हा पुतळा तयार करण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला. त्यांचा आउटफिट तयार करणे सर्वात जास्त आव्हानात्मक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान श्रीदेवी यांचे क्राउन, कफ्स, ईयरिंग्स आणि ड्रेसच्या 3D प्रिंटच्या अनेक टेस्ट घेण्यात आल्या होत्या.

२३ देशांमध्ये मादाम तुसॉं संग्रहालये आहेत. सर्वात पहिले संग्रहालय हे १८३५ साली लंडनमधील बेकर स्ट्रीट येथे तयार करण्यात आले होते.  भारतातील अनेक दिग्गज कलाकारांचे मेणाचे पुतळे सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात आहेत. बिग बी अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, शाहरुख खानसारख्या दिग्गज कलाकार तर अभिनेत्री अनुष्का शर्मा, शाहिद कपूर,  दीपिका पदुकोण, देसी गर्ल प्रियांका चोप्राचा देखील मेणाचा पुतळा या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here