घरमनोरंजनजाणून घ्या कितीला विकला जातो तैमुरचा एक फोटो

जाणून घ्या कितीला विकला जातो तैमुरचा एक फोटो

Subscribe

तैमुर अली खान फक्त आपल्या आई-वडिलांमुळे प्रसिद्धनाही तर त्याचाही एक वेगळा फॅन वर्ग आहे. तैमुरच्या फोटोची किंमत ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

बॉलिवूड चित्रपटात काम न करताच छोटे नवाब म्हणून ओळख असलेला तैमुर खान सध्या कोणत्या सेलिब्रिटीहून कमी नाही. त्याची लोकप्रियतेमुळे त्याचा एक वेगळाच फॅन वर्ग आहे. प्रसिद्ध असल्यामुळे तैमुर सोशल मीडियावर नेहेमीच चर्चेत असतो. तैमूरच्या नावाच्या मीम्सचा सोशल मीडियावर पाऊस पडतच असतो. नेहेमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तैमुर चर्चेत असतो. तैमुर गोंडस असल्यामुळे अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे फोटो आहेत. याच बरोबर तैमुरचे वडिल सैफ अली खान आणि आई करीना कपूर खानबरोबर अनेक फोटोमध्ये झळकतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तैमुरचे फोटोही विकल्या जातात. याबद्दल नुकताच सैफ अली खान याने खुलासा केला आहे.

- Advertisement -

कॉफी विथ करणमध्ये केला खुलासा

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये सैफ अली खान आणि मुलगी सारा अली खान आले होते. या कार्यक्रमादरम्यान सैफ अली खान ने प्रोफेशन आणि पर्सनल लाईफ शेअर केली. सैफ ने तैमुर बद्दल सांगितलेल्या किस्सा ऐकल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. तैमुरचा एक फोटो १५०० रूपयांना विकला जातो. सैफचे सासरे म्हणजेच रणधीर कपूर ने त्याला ही माहिती दिली. सैफची ही गोष्ट ऐकून सारालाही आश्चर्याचा धक्का बसला.

 

View this post on Instagram

 

Hi handsome lagra hoon na mein ?

A post shared by Taimur Ali Khan Pataudi ?? (@taimuralikhanx) on

- Advertisement -

सुपरस्टारहून अधिक किंमत

सैफने दिलेल्या माहितीनंतर करण जोहर म्हणाला की,”तैमुरच्या फोटोची किंमत एका सुपरस्टारहून जास्त आहे. तैमुरचा रेटकार्ड प्रथम क्रमांकावर असेल.” सैफने सांगितले ज्या चित्रपटात तो काम करतो त्यातील दिग्दर्शक त्याची मसकरी करतात. तैमुरला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी घेण्यासाठी नेहेमी सैफला सांगितल्या जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -