मराठी नाटकाच्या कक्षा रूंदावताहेत

Mumbai
Piyano for sale

नाटक म्हंटल की ठराविक चौकट ही आलीच. नाटक सादर करण्यासाठी जी जागेची आवश्यकता असते, त्याप्रमाणे महाराष्ट्रात नाट्यगृह उभारलेले आहेत. त्यातूनही एखाद्या संस्थेला महानाट्य करायचे झाले तर मोकळे मैदान, स्टेडिअम यांचा वापर करावा लागतो. ‘जाणता राजा’ या नाटकाच्या निमित्ताने महाराष्ट्रात अनेक महानाटकांची निर्मिती झालेली आहे. साईबाबा, स्वामी समर्थ, महाभारत, रामायण यांचे दर्शन या महानाटकाच्या निमित्ताने घडलेले आहे. परंतु महाराष्ट्रातल्या रंगभूमीची जी रचना आहे त्यात भव्यदिव्य काही होऊ शकते का याचा विचार फारसा झाला नव्हता. पण अलिकडच्या काळात तो होताना दिसत आहे. झी समुहाच्यावतीने ज्या नाटकांची निर्मिती केली गेली त्यात ही भव्यता दिसलेली आहे.

हॅम्लेट, अलबत्या गलबत्या ही नाटकं पाहिल्यानंतर त्याचा प्रत्यय येतो. मराठी नाटकाच्या कक्षा रूंदावताहेत असे विधान करण्याचे कारण म्हणजे ‘ग्रॅन्ड प्रिमिअर’ हा शब्द फक्त चित्रपटाच्या प्रीमिअर शोपुरता मर्यादीत होता. ‘पियानो फॉर सेल’ या नाटकाच्या निमित्ताने तो खर्या अर्थाने विस्तारलेला दिसतो. येणार्या प्रतिष्ठीत व्यक्ती, सेलिब्रिटी कलाकारांचे स्वागत लाल कारपेटवर करण्यात आले होते. इथेसुद्धा अशा पद्धतीचे आयोजन करताना भव्यदिव्य रंगमंचाचा विचार केला जातो. शिवाजी मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वच कलाकारांचे आजही श्रद्धास्थान आहे. या रंगमंचावर आपली प्रतिमा उजळावी, आपल्यासाठीही टाळ्यांचा कडकडाट व्हावा ही प्रत्येक कलाकाराची इच्छा असते.

अशा ठिकाणी ‘पियानो फॉर सेल’ या नाटकाचा पहिलावहिला प्रयोग झाला होता आणि आता तो संपूर्ण महाराष्ट्रात करण्यासाठी सज्ज झालेला आहे. वर्षा ऊसगावकर, किशोरी शहाणे-वीज अभिनीत या नाटकाच्या प्रयोगाला मंगेशकर कुटुंबियांच्यावतीने उषा मंगेशकर, मीना खाडिलकर उपस्थित होते. शिवाजी साटम, किरण शांताराम, अनुप जलोटा, दीपक बलराज वीज, गश्मीर महाजनी, अनुराधा राजाध्यक्ष या मान्यवरांचे उपस्थित राहणे कौतुकास्पदच म्हणावे लागेल. आशिष कुलकर्णी याने इंग्रजी नाटकाचे मराठी नाट्यरूपांतर करून आपल्या दिग्दर्शनात ‘पियानो फॉर सेल’ हे नाटक सादर केलेले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here