आम्ही बिनधास्त बोलणार

Mumbai
Amey wagh

मुलाखत म्हंटली की हातचं राखून बोलणं हे आलेच. ठरावीक प्रश्न, ठरावीक उत्तर असा काहीसा मुलाखतीचा असलेला साचा आता पूर्णपणे बदललेला आहे. रोखठोक, मुक्तपणे बोला, व्यक्त व्हा असे आता मुलाखतीचे नवे रुप झालेले आहे. सोशल नेटवर्कच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. चित्रपटाशिवाय. आपल्या लाडक्या कलाकाराच्या वैयक्तिक जीवनात काही घडते का याची उत्सुकता प्रेक्षकांना असतेच आणि कलाकारांनीही आढेवेढे न घेता बेधडकपणे उत्तर देणे सुरू केलेले आहे. याचा प्रत्यय एम एक्स प्लेअरच्या अ‍ॅपवर प्रेक्षकांना घेता येईल. ‘फेमसली फिल्मफेअर’ हे या कार्यक्रमाचे नाव आहे.

एम एक्स प्लेअरच्या टीमने त्यातसुद्धा एक अभिनव प्रयोग केलेला आहे. सात भाषांत, साठ भागांची निर्मिती केलेली आहे. सहा बोलबच्चन निवेदकांवर सूत्रसंचलनाची जबाबदारी सोपवलेली आहे. गप्पा झाल्याच पाहिजेत; पण त्यात हटकेपणा असायला हवा असा निर्मात्याचा आग्रह आहे. त्या त्या प्रांतात २० फेब्रुवारीपासून हे भाग दाखवणे सुरू होईल. त्यामुळे हिंदीबरोबर त्या कलाकाराच्या मातृभाषेतही संवाद साधणे होणार आहे. आता या बेधडक गप्पांमध्ये मराठीतले कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या बिनधास्त बोलणार्‍यांच्या यादीत सोनाली कुलकर्णी, रेणुका शहाणे, स्वप्निल जोशी, अमेय वाघ, प्रिया बापट, सई ताम्हणकर या कलाकारांची नावे आहेत. मराठीबरोबर कन्नड, मल्याळम, तेलगू, तामीळ, पंजाबी , बंगाली कलाकारही या उपक्रमात असणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here