हिमेशने अनुष्काला दिलं ‘हे’ खास सरप्राईझ

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोमध्ये येत्या आठवड्यात गायक आणि  संगीतकार हिमेश रेशमिया हा परीक्षक म्हणून या कार्यक्रमात सहभागी होत आहे. यावेळी हिमशने स्पर्धक अनुष्का पात्राला खास सरप्राईझ दिलं आहे.

Mumbai
Anushka Patra
अनुष्का पात्रा

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकांनी सादर केलेल्या अप्रतिम गाण्यांनी कायमच प्रेक्षक आश्चर्यचकित होत असतात. येत्या आठवड्यात गायक आणि  संगीतकार हिमेश रेशमिया हा परीक्षक म्हणून या कार्यक्रमात सहभागी होत आहे. आपल्या स्वगृही आल्यावर आनंदित झालेल्या हिमेश रेशमियानेही स्पर्धकांना केवळ प्रोत्साहन दिले नाही, तर त्यांनी अधिक चांगल्या प्रकारे गाणे कसे गावे, याचे मार्गदर्शनही केले.

Anushka Patra
अनुष्का पात्रा

काही लिटिल चॅम्प्सच्या सुरेल गीते ऐकल्यानंतर अनुष्का पात्रा या बालस्पर्धकाने गायलेल्या ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’ चित्रपटातील ‘पर्दा पर्दा’  या गाण्यमुळे हिमेश एकदम भारावून गेला. सर्वच परीक्षकांनीही अनुष्काची या गाण्याबद्दल जोरदार प्रशंसा केली; पण नंतर हिमेशने जी कृती केली, त्यामुळे अनुष्काचे जीवनच बदलून गेले! हिमेशने चक्क आपल्या ‘एक्सपोझे रिटर्न्स’  या आगामी चित्रपटात पार्श्वगायन करण्याची ऑफर तिला दिली! तिच्या सुरेल आवाजाने आणि अप्रतिम सादरीकरणाने पुरता भारावून गेलेल्या हिमेशने तिची स्तुती करताना सांगितले, “अनुष्का, तू तर पार्श्वगायन करण्यास अगदी तयार झाली आहेस. बॉलीवूडच्या चित्रपटांसाठी लागणारा अचूक आवाज आणि पार्श्वगायनासाठी लागणारा आत्मविश्वास तुझ्याकडे आहे. तसंच गाण्याकडे योग्य पध्दतीने पाहण्याचा दृष्टिकोनही तुझ्याकडे आहे. म्हणूनच माझ्या एक्सपोझे रिटर्न्स’  या आगामी चित्रपटासाठी तू पार्श्वगायन करावंस, अशी माझी इच्छा आहे!”

कार्यक्रमात स्पर्धकांनी अतिथी परीक्षक असलेल्या हिमेश रेशमियाची काही अतिशय गाजलेली गाणी एकामागोमाग एक अप्रतिम शैलीत सादर केली. यापूर्वी जेव्हा हिमेश या कार्यक्रमात सहभागी झाला होता, तेव्हा त्याने त्यातील छोटे भगवान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका स्पर्धकाला जो गुरुमंत्र दिला होता (जय माता दी लेटस रॉक!) त्याची सर्वांना आठवण आली. त्याशिवाय अमाल मलिक या परीक्षकाच्या आईने हिमेशची काही गुपिते एका व्हिडिओ संदेशाद्वारे उघड केल्याने कार्यक्रमात एकच धमाल झाली. तसेच आपल्या जंगली या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी या कार्यक्रमात सहभागी झालेला अभिनेता विद्युत जमवाल यानेही आपल्या तंदुरुस्त शरीराची काही गुपिते सांगितली. एकंदरीतच या वीकेण्डच्या भागात काही संस्मरणीय क्षण आणि अप्रतिम गाणी पाहायला मिळतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here