आदेश भावोजींच्या रंगणार पैठणीचा खेळ!

होम मिनिस्टरचा स्पेशल एपिसोड आदेश बांदेकरांच्या घरी रंगणार आहे.

Mumbai

‘दार उघड बये, दार उघड’ असं म्हणत घरा घरात पोहचलेले आदेश भावोजींनी खूप कमी दिवसात तमाम वहिनींच्या मनात घर केलं आहे. कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं? दोघांपैकी कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न बांदेकर सगळ्यांना वहिनींना विचारतात. आणि वहिनी देखील न लाजता न चिडता याची उत्तर अगदी बिनधास्त देतात. आता हाच प्रश्न-उत्तरांचा तास खुद्द भावोजींच्याच घरात रंगणार आहे.

View this post on Instagram

Prachar dr Shrikant shinde yancha

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar) on

त्यामुळे तुम्हाला आता भावोजींच लग्न सक जमलं?कुठे दोघं भेटले? बांदेकर वहिनी भावोजींना कशी हाक मारतात? हे समजणार आहे. गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा, अनेक कुटुंबाना एकत्र आणणारा आणि घराघरातील वहिनींना पैठणीचा बहुमान देणारा हा कार्यक्रम लवकरच १५ वर्षे पूर्ण करत आहे. या कार्यक्रमाची आजवर अनेक पर्व झाली. नुकतंच तमाम वहिनींसाठी होम मिनिस्टरच ‘अग्गबाई सासूबाई’ हे पर्व सादर होतंय. सासू – सुनेच्या नात्यातील गोडवा या पर्वातून आदेश बांदेकर उलगडतात. याच पर्वाचा भाग म्हणून आदेश बांदेकर यांच्या सौ अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि आदेश भावोजींचं संपूर्ण कुटुंब या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या भागात पैठणीचा खेळ भावोजींच्या घरीच रंगणार आहे.

View this post on Instagram

Homeminister

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar) on

त्यामुळे भावोजी आता कार्यक्रमात कशी उत्तर देणार, पैठणी कोण जिंकणार? किती बक्षीस जिंकणार हे बघण्यासाठी हा भाग अजिबात चुकवू नका.