…अशी सुचली बॉईज-२ ची कथा

५ ऑक्टोबरला चित्रपटाचा सिक्वल बॉईज २ प्रदर्शित होत आहे. बॉईज २ लिहीण्यामागे ही एक कास गोष्ट आहे.

Mumbai
Boyz 2
बॉईज २

‘बॉईज’ चित्रपटाला तरूणाईंनी डोक्यावर घेतलं. बॉईजच्या यशानंतर येत्या ५ ऑक्टोबरला चित्रपटाचा सिक्वल बॉईज २ प्रदर्शित होत आहे. बॉईज चित्रपटाप्रमाणे बॉईज २ मध्ये ही तीच धम्मालमस्ती अनुभवता येणार आहे. मात्र ही गोष्ट सुचण्यामागेही एक गोष्ट आहे.

काय आहे बॉईज २ मागची गोष्ट

विशाल देवरुखकर यांनी बॉईज २ चं दिग्दर्शन केलं आहे. ‘बॉईज’ च्या सिक्वलसाठी तितकाच ताकदीचा विषय निवडणदेखील गरजेचं होतं, त्यासाठी तोडीस तोड अश्या विषयाच्या शोधात मी आणि ऋषिकेश कोळी होतो. परंतु, चार-पाच महिने होऊनदेखील आम्हाला काहीच सुचत नव्हत. मात्र, एकदा अचानक माझा फोन बंद झाला, आणि त्यातूनच ‘बॉईज २’ ची गोष्ट आम्हाला सापडली’, असं विशाल देवरुखकर यांनी  सांगितले. अवघ्या दोन तीन तासासाठीच बंद पडलेल्या फोनमुळे जर मी इतका अवस्था होत असेल,  तर कॉलेजतरुणासाठी त्यांचा फोन किती महत्वाचा असेल? असा प्रश्न मला पडला. मी लगेचच हा विचार ऋषीकेश कोळीला बोलून दाखवला. ऋषिकेशनेदेखील त्याला पसंती देत ‘बॉईज २’ चं लिखाण सुरु केलं. अश्या या अनावधाने सुचलेल्या ‘बॉईज २’ चित्रपटामध्ये शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या ‘बॉईज’ ची धम्माल पाहायला मिळणार आहे.

कलाकार नवे की जुनेच?

तीन मित्रांचं रंजक पण तितकीच भावनिक जग मूळ बॉईज चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. त्यावेळी चित्रपटात सुमंत शिंदे, प्रतिक लाड, रितीका श्रोत्री, संतोश जुवेकर आणि पार्थ भालेराव आदी कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. दरम्यान बॉईज-२ च्या टिझरमध्ये काही नवीन चेहरे देखील आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे बॉईजच्या दुसऱ्या भागातील कलाकार नवीन असणार, जुने असणार की नव्या-जुन्या कलाकारांची टीम असणार? याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली असणार हे नक्की.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here