घरमनोरंजनमधुर भांडारकरच्या 'चांदनी बार'ची छमछम पुन्हा एकदा!

मधुर भांडारकरच्या ‘चांदनी बार’ची छमछम पुन्हा एकदा!

Subscribe

निर्माता-दिग्दर्शक मधुर भांडारकरचा १७ वर्षांपूर्वी आलेला चांदनी बार हा सिनेमा त्यावेळी सुपरहिट ठरला होता. अभिनेत्री तब्बूने तिच्या जबरदस्त अभिनयाने या सिनेमाला चार चांद लावले होते. याच सिनेमाने तब्बूला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. सूत्रांनुसार, लवकरच मधुर भांडारकर ‘चांदनी बार’चा दुसरा भाग घेऊन येत आहे.

चांदनी बार सिनेमाच्या दुसऱ्या भागाचं दिग्दर्शन स्वत: मधुर भांडारकर करणार असून, शैलेश सिंग या सिनेमाची निर्मीती करणार असल्याचं समजतंय. सध्या या सिनेमाच्या पटकथेवर काम सुरु आहे. सन २००१ मध्ये आलेल्या चांदनी बार या सिनेमात मधुर भांडाकरने, बार गर्ल्सचं जीवन आणि त्यांच्या व्यथा यावर नाट्यपूर्ण भाष्य केले होते. त्यावेळी समाजात हा विषय ज्वलंत असल्यामुळे, लोकांकडूनही सिनेमाला भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णी यानेही सिनेमात महत्वाची भूमिका बजावली होती.

- Advertisement -

सध्या चांदनी बारच्या दुसऱ्या भागाची कथा आणि सिनेमातील कास्टिंग यावर काम सुरु असल्याचं कळतंय. या वर्षाअखेरीपर्यंत सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल अशी चर्चा आहे. मात्र पहिल्या भागात मुख्य भूमिका साकारणारी तब्बू दुसऱ्या भागात देखील झळकणार का? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -