‘मोदी’ Trailer रिलीज; स्वत: मोदींची प्रतिक्रिया काय?

नरेंद्र मोदींच्या बालपणापासून ते सद्यस्थितीपर्यंतच्या संपूर्ण प्रवासावर हा चित्रपट बेतला असून, त्याची झलक आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

Mumbai
modi trailer out

‘पीएम नरेंद्र मोदी’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित या बायोपिकपमध्ये अभिनेता विवेक ऑबेरॉयने मोदींची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच काही ना काही कारणाने हा चित्रपट चर्चेत होता. चित्रपटाच्या पोस्टरवरील विवेक ओबेरॉयचा मोदी लूक तर विशेष चर्चेत आला होता. विवेक अजिबात मोदींसारखा दिसत नसल्याचं म्हणत, नेटिझन्सनी सोशल मीडियावर त्याला जोरदार ट्रोलही केलं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या ट्रेलरविषयीची उत्सुकता अधिकच वाढली होती. सध्या  ‘पीएम नरेंद्र मोदी’चा ट्रेलर युट्यूबसह सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोबतच यानिमित्ताने पुन्हा एकदा अभिनेता विवेक ओबेरॉय याला ट्रोल करण्यात येत आहे.

उलगडला मोदींचा जीवनप्रवास…

चित्रपटाच्या ट्रेलरमधील ‘मेरा गुजरात जल रहा है…’ हा डायलॉग सर्वांचं लक्ष वेधून घेतं. हा डायलॉग म्हणताना नरेंद्र मोदी यांची गुजरातप्रती असणारी आपुलकी आणि त्यांचं भावुक रुप विशेष लक्षवेधी ठरलं आहे. नरेंद्र मोदींच्या बालपणापासून ते सद्यस्थितीपर्यंतच्या संपूर्ण प्रवासावर हा चित्रपट बेतला असून, त्याची झलक आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. मोदी आजवर कशाप्रकारे त्यांच्या जीनवमुल्यावर जगत आले आणि त्यातून इतरांना प्रेरित करत राहिले हे यामध्ये दाखवण्यात आलं आहे. याशिवाय इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या काळात देशात घडलेल्या घडामोडींची दखल घेण्यात आली असून, त्याच्याशी निगडीत काही प्रसंगही यामध्ये दाखवण्यात आले आहेत.  ‘पाकिस्तानला मी आव्हान देतो, पुन्हा जर मजाल केलीत तर हात कापेन’, असं म्हणणारे मोदी आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. मोदींनी सर्जिकल स्ट्राईकसह घेतलेले अन्य महत्वाचे निर्णयही चित्रपटामध्ये समर्पकपणे दाखवण्यात आले आहेत.

दरम्यान, स्वत: नरेंद्र मोदी यांनी याविषयी काय प्रतिक्रिया दिली आहे? याची सर्वांनाच उत्सुकता असेल. मात्र, या ट्रेलरविषयी अद्याप त्यांनी कोणतीच जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. आता स्वत:च्याच बायोपिकवर मोदी स्वत: मोदी काही प्रतिक्रिया देणार का? आणि दिल्यास ती नक्की कशी असणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here