घरमनोरंजनJhund Teaser Out- 'झुंड नही टीम है ये सब!'

Jhund Teaser Out- ‘झुंड नही टीम है ये सब!’

Subscribe

दिग्दर्शक नागराज मंजूळे दिग्दर्शित झुंड चित्रपटाचे पोस्टर काल प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरला खूप प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. हे पोस्टर शेअर करताना नागराजने उद्या टीजऱ येणार असं कॅप्शन लिहीलं होतं. त्यामुळे उत्सुकता आणखीनच वाढली आणि अखेर झुंडचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा टीझर अवघ्या काही मिनीटातच लाखापेक्षा जास्त लोकांनी हा टीझर बघितला आहे. याटीझरमध्ये अनेक मुलं एकत्र चालताना दिसत आहे. या मुलांच्या बॅकराऊंडला झुंडचं गाणं वाजत आहे.

सैराट,नाळ नंतर दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्या झुंड चित्रपटाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. याच मुख्य कारण म्हणजे या चित्रपट बिग बी अमिताभ बच्चन मुख्य भुमिकेत आहेत. त्याचबरोबर नागराजचा हा पहिला हिंदी चित्रपट आहे. आपल्या पहिल्याच हिंदी चित्रपटात नागराज बिग बींबरोबर काम करणार आहे. झुंडचे पहिले पोस्टर काल सोशल मीडियालर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना व्यसनापासून दूर करण्यासाठी त्यांच्यामध्ये फुटबॉलची आवड निर्माण करणाऱ्या विजय बारसे यांची व्यक्तिरेखा, बिग बी या चित्रपटात साकारणार आहेत.‘झुंड’ हा चित्रपट विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. त्यांच्या याच कथेवर हा चित्रपट बेतला असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात पहिलं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

पहिल्या पोस्टरमध्ये पाठमोरे उभे असलेले अमिताभ बच्चन दिसत आहेत. ते एका झोपडपट्टीसमोर उभे राहून कसला तरी विचार करताना दिसत आहेत.अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे हे दोन प्रतिभावंत कलाकार या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आले असल्यानं ‘झुंड’बद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे.

अनेक अडचणी झुंड प्रदर्शित होणार

कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी हैदराबादमधील दिग्दर्शक नंदी चिन्नी कुमार यांनी चित्रपटाच्या टीमला कायदेशीर नोटीस बजावली होती. झुंड चित्रपटाच्या टीमनं कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यासाठी त्यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे, अमिताभ बच्चन,निर्माते कृष्णन कुमार यांना नोटीस बजावली होती. अखिलेश पॉल यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचे हक्क कुमार यांनी विकत घेतले होते. २०१० साली ब्राझील मध्ये अखिलेश फुटब़ल वर्ल्ड कप भारतीय संघाचा कॅप्टन होता. झोपडपट्टीत राहणारा, ड्रग्जच्या आहारी गेलेल्या अखिलेशचे आयुष्य फुटबॉलमुळे कसे बदलते अशी चित्रपटाची कथा असणार आहे. नागराजही अखिलेशचे प्रशिक्षक विजय बरसे यांच्यावर चित्रपट बनवत आहे. पण प्रशिक्षकावर कथा करताना अखिलेश खूप महत्त्वाचा ठरतो. याच कारणानं झुंडच्या टीमकडून कॉपीराइटच उल्लंघन झाल्याचं कुमार यांचं म्हणणं होतं. त्याचप्रमाणे झुंडचा पहिला सेट पुण्यात उभारण्यात आला होता. त्यानंतर तो नागपूरमध्ये हलवण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -