Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी VIDEO: बाबो! नोरा फतेहीला करायचंय तैमूर खानशी लग्न; म्हणाली,

VIDEO: बाबो! नोरा फतेहीला करायचंय तैमूर खानशी लग्न; म्हणाली,

बॉलिवूडची टॉप डान्सर नोरा फतेही म्हणते मला तैमूरशी लग्न करायचे आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची टॉप डान्सर नोरा फतेही नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. आपल्या अभिनयापेक्षा डान्समुळे चर्चेत असणारी नोरा सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती चर्चेत डान्समुळे नाही तर लग्नामुळे आल्याचे दिसून येत आहे. तिने आपल्याला लग्न करायचे सांगितले आहे. विशेष म्हणजे तिला चक्क तैमूर खानशी लग्न करायचं आहे. हे ऐकून तैमूरची आई करीना देखील शॉक झाली आहे.

काय म्हणाली नोरा?

करीना कपूरचा ‘वॉट वुमन वॉन्ट’ हा शो चांगलाच लोकप्रिय आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी येत असतात. या सेलिब्रिटींना करीना अनेक प्रश्न विचारते. दरम्यान, बॉलिवूडची टॉप डान्सर नोरा फतेही या शोमध्ये आली होती. यावेळी करीनाने तिला तिच्या लाइफविषयी अनेक प्रश्न विचारले. त्यावर नोरा म्हणाली ‘मला तैमूर खानशी लग्न करायचे आहे. तो कधी मोठा होतो याची मी वाट पाहत आहे’. यावर करीना काही सेकंद शॉक झाली. नोराच्या प्रतिक्रियेवर काय उत्तर द्यावे हे करीना काहीक क्षण कळलेच नाही.

- Advertisement -

करीना म्हणाली…

नोराने दिलेल्या उत्तरावर करीना हसत म्हणाली की, ‘तो फक्त चार वर्षांचा आहे’. त्यावर नोरा म्हणाली, ‘तो कधी मोठा होत आहे, याचीच मी वाट पाहत आहे. मी त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी थांबू शकते’. दरम्यान, सोशल मीडियावर सध्या नोरा आणि तैमूर हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. अनेकांनी नोराच्या या प्रतिक्रियेवर कमेंट्स देखील दिल्या आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला देखील आहे.


- Advertisement -

हेही वाचा – माझ्यावर हसणाऱ्यांवर आता रडण्याची वेळ, कंगना रनौतचे नवे ट्वीट


 

- Advertisement -