घरमनोरंजनसंजूबाबाला 'या' अभिनेत्रीला बनवायचे आहे ३०९ वी गर्लफ्रेंड!

संजूबाबाला ‘या’ अभिनेत्रीला बनवायचे आहे ३०९ वी गर्लफ्रेंड!

Subscribe

अभिनेता संजय दत्त तिच्या प्रेमात पडतो... हे स्वतः संजय दत्तने सांगितले

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा पानीपत हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूर, संजय कपूर आणि अभिनेत्री कृती सेनन ही स्टार कास्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिनही कलाकार व्यस्त आहेत. पानीपतमध्ये कृती सेनन अर्जून कपूरच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. मात्र असे दिसते की चित्रपटाचा खलनायक संजय दत्त तिच्या प्रेमात पडतो… हे स्वतः संजय दत्तने सांगितले आहे.

- Advertisement -

नुकतेच संजय दत्त एका विनोदी कार्यक्रमात पानीपतच्या प्रमोशनकरता पोहोचले होते. या कार्यक्रमादरम्यान कृती सेननची खूप स्तुती संजय दत्तने केली. यावेळी संजयने सांगितले की, कृती सेननच्य़ा चित्रपटातील अभिनय आणि कामाने ते खूपच प्रभावित झाले असून, कृती संजय दत्तची ३०९ वी गर्लफ्रेंड होऊ शकते.

- Advertisement -

संजय दत्तच्या जीवनावर आधारलेल्या संजू या चित्रपटात त्याच्या ३०८ गर्लफ्रेंड असतात. त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान संजय दत्तने मजेत असे सांगितले की, ‘कृती माझी ३०९ वी गर्लफ्रेंड होऊ शकते.’

हेही वाचा- ‘पानीपत’चे ‘सपना है सच है’ रोमँटिक गाणं प्रदर्शित

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानीपत’ हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. सदाशिव राव आणि पार्वतीबाई यांच्या लग्नाचे चित्रीकरण दाखवण्यात आले आहे. पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीच्या या लग्नात सदाशिव राव आणि पार्वतीबाई यांच्या प्रेमकथेचे सुंदर चित्रण केले गेले आहे. क्रितीने पार्वतीबाईंची भूमिका साकारली असून, भरजरी साडी, जड दागिने कपाळी चंद्रकोरमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहेत. तर अर्जुन कपूरही सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत योग्य बसला आहे.हा चित्रपट पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित असून सन १७६१ मध्ये झालेलं हे युद्ध भारताच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाचं युद्ध मानले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -