घरमनोरंजन'आम्ही बेफिकर' चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच

‘आम्ही बेफिकर’ चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच

Subscribe

चार मित्रांची 'बेफिकीर' गोष्ट असलेला 'आम्ही बेफिकरर' हा चित्रपट ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

कॉलेजमध्ये शिकत असतानाचं एकंदर आयुष्य धमाल आणि निवांत असतं. एकीकडे मनात करिअरचा विचार असला तरी दुसरीकडे बेधुंदी, बेफिक्रीसुद्धा असते. अशाच चार बेफिकीर मित्रांची रंजक गोष्ट ‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकतंच आम्ही बेफिकर’ या चित्रपटाचं टीजर पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. चार मित्रांची ही धमाल गोष्ट ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चित्रपटाच्या पोस्टरवरूनच हा चित्रपट युथफुल आणि धमाल असल्याचा अंदाज बांधता येतो. हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे आणि रोहित चव्हाण यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, रोहित पाटील हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांचं असून, चित्रपटाचे संगीत प्रणय अढांगळे यांचे आहे. खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच मावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले अशा अर्थाच्या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा आणि त्यांच्या मनातले विचार, त्यांच्या व्यथा, त्यांच्या मागण्या या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


वाचा: ‘हे’ ३ सुपरहिरो येणार आमने-सामने

‘आम्ही बेफिकर’ या नव्या-कोऱ्या चित्रपटाच्या माध्यमातून सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुयोग आणि मिताली अनेक मालिका-चित्रपटांतून आपल्यापुढे आले आहेत. मात्र, “आम्ही बेफिकर” हा त्यांचा एकत्रित पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्यासह राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे नव्या दमाचे कलाकार आणि नव्या पिढीचा विषय मांडणारा हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल, अशी आशा निर्माते आणि दिग्दर्शक यांनी व्यक्त केली आहे.
चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -