‘द स्काय इज पिंक’मुळे प्रियांका -फरहान पोलिसांच्या तावडीत!

महाराष्ट्र पोलिसांनी ट्वीट करत प्रियांका- फरहानला वेठीस धरलं आहे. पण या ट्रेलरमधील एका डायलॉगमूळे प्रियांका फरहान पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत.

Mumbai
priyanka chopre arrest
प्रातिनिधिक छायाचित्र

प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तरची मुख्य भुमिका असणारा ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप पसंतीही दिली. प्रियांका चोप्राचा कमबॅक म्हणून या चित्रपटाकडे बघितले जात आहे. पण या ट्रेलरमधील एका डायलॉगमूळे प्रियांका फरहान पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत.

ट्रेलरमध्ये प्रियांका आणि फरहान यांची मुलगी जायरा वसीम आजारी पडते. ते दोघेही आपल्या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. यावेळी प्रियांका फरहानला म्हणते, ‘एक बार आयशी ठीक हो जाय, फिर साथ मे बँक लुटेंगे’… या डायलॉगवर गेलं पोलिसांच लक्ष. या डायलॉगवरून महाराष्ट्र पोलिसांनी ट्वीट करत प्रियांका- फरहानला वेठीस धरलं आहे. ‘बँकलुटीच्या गुन्ह्यासाठी सात वर्ष तुरुंगवास आणि दंड.. कलम ३९३ अंतर्गत शिक्षा’ असं ट्विट महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आलंय. असे गुन्हे करू नका, नाहीतर शिक्षा झालीच समजा हा सल्ला पोलिसांनी प्रियांका आणि फरहानच्या या डायलॉगच्या निमित्ताने दिलाय.

महाराष्ट्र पोलिसांनी ट्रेलरचा एक स्क्रीन सॉर्ट शेअर करत हा सल्ला शेअर केला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या या ट्वीट नंतर प्रियांकालाही तिची चुक समजली आहे. त्यांच्या या ट्वीटला उत्तर देताना, “मै रंगे हाथों पकड गयी’ अशा आशयाचं ट्वीट केलं आहे.

‘द स्काय इज पिंक’ चित्रपटात आई- वडिलांच्या लव्ह- स्टोरीत स्वत:ला खलनायक मानणाऱ्या मुलीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. आपणच आपल्या आई – वडिलांचे विहीलन आहोत असं तीला सारखं वाटत असतं. चित्रपटाची कथा फरहान- प्रियांकाबरोबरच झायरा वसीमच्या भोवती फिरते.चित्रपटाच्या ट्रेलरवरून चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट प्रियांकासाठी कमबॅक असला तरी झायरा वसीमचा हा शेवटचा चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वी सोशलमिडीयावर झायराने चित्रपटसृष्टी सोडल्याचा निर्णय जाहीर केला होता. आता खरच झायरा चित्रपटसृष्टी सोडतेय की नाही हे येणारा काळच ठरवेल.