घरताज्या घडामोडीफ्रिजपेक्षा जास्त थंड आहे राखीचा हिरो; पाहा व्हायरल व्हिडिओ

फ्रिजपेक्षा जास्त थंड आहे राखीचा हिरो; पाहा व्हायरल व्हिडिओ

Subscribe

नेहमीच सोशल मीडियावर बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत अॅक्टिव असते. गेल्या काही महिन्यांपासून तिने सोशल मीडियावरुन विवाहबंधनात अडकल्याची माहिती दिली होती. तिने अमेरिकेतील एनआरआय व्यक्तीसोबत लग्न केल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे ती अजून चर्चेत आली. मात्र आता राखी कामात व्यग्र झाली आहे. दोन दिवसांपूर्वी राखीने शूटिंगचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये राखी एका गाण्याचं शूटिंग करताना दिसतं आहे. राखीने व्हिडिओबद्दलची कोणतीही माहिती शेअर केली नसून तिने त्यातील हिरोबद्दलचे जबरदस्त कॅम्पश दिलं आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर राखीच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. १ लाख २० हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना राखीने लिहिलं, ‘कैसा हिरो है, फ्रिज से भी ज्यादा ठंडा’

- Advertisement -

या व्हिडिओत राखी सावंत रोमँटिक सीक्वेंन्सचे शूट करताना दिसत आहे. या रोमँटिक गाण्याचं शूट वाळवंटात होत असून राखी रेड कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. मात्र तिच्यासोबत असलेला हिरो नर्व्हस दिसत आहे.

काही चाहत्यांनी राखीला पाहून कदाचित तो अॅक्टिंग विसरल असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर काही जण तिला तुझ्या नवरा कुठे आहे? असं देखील विचारत आहे.


हेही वाचा – चाहतीच्या सततच्या मेसेजला कंटाळला ‘हा’ अभिनेता,घेतला ‘हा’ निर्णय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -