घरमनोरंजनVideo: राखी सासरी गेल्यावर तीची आई करणार चाहत्यांची करमणूक!

Video: राखी सासरी गेल्यावर तीची आई करणार चाहत्यांची करमणूक!

Subscribe

राखीने इन्स्टाग्रामवर आईचे व्हीडीओ शेअर केले आहेत. तीने आईचे नवीन अकाऊंटही उघडले आहे. मी सासरी निघून घेल्यावर आई तुमचं मनोरंजन करेल असेही तीने हा व्हीडीओ शेअर करताना म्हटले आहे.

ड्रामा क्वीन म्हटलं की एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे राखी सावंत. रोज नवीन काहीतरी ड्रामे करून ती सोशलमिडीयावर कायम चर्चेत असते. ती तीच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट एका वेगळ्या प्रकारे चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. काही दिवसांपूर्वी राखीने गुपचूप लग्न केलं. राखीचा नवरा हा युकेचा आहे. आता ती कायम स्वरूपी सासरीही जाणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल राखी कायमची सासरी गेल्यावर आपलं मनोरंजन कोण करणार? पण हा प्रश्न राखीनेच सोडवला आहे. आता राखी एवजी तिची आई तुमचं मनोरंजन करणार आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेलना पण हे खरं आहे.

View this post on Instagram

Wooow my mommy is best

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

- Advertisement -

राखीने इन्स्टाग्रामवर आईचे व्हीडीओ शेअर केले आहेत. तीने आईचे नवीन अकाऊंटही उघडले आहे. मी सासरी निघून घेल्यावर आई तुमचं मनोरंजन करेल असेही तीने हा व्हीडीओ शेअर करताना म्हटले आहे. या व्हीडीओत राखीची आई टिकटॉकवरच्या एका व्हीडीओत डान्स करताना दिसत आहे. हा व्हीडीओ शेअर करताना राखी म्हणते, ‘अभिनंदन मम्मी, तू चिकचॉकवर आलीस, मी युकेला स्थायिक झाल्यावर माझी आई चाहत्यांच्या करमणुकीची जबाबदारी स्विकारेल. चाहत्यांनो मला तुमची प्रचंड काळजी आहे.’ अस म्हणत तीने हा व्हीडीओ शेअर केला आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये राखीने एका एनआरआयशी लग्न केले. पण त्याचा फोटो राखीने अद्याप शेअर केलेला नाहीये. त्यामुळे हा देखील राखीचा एक ड्रामाच असू शकतो असे काहींचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -