घरCORONA UPDATEरेखा यांचा कोरोना चाचणीला नकार; बीएमसीच्या पथकाला घरात घेतले नाही

रेखा यांचा कोरोना चाचणीला नकार; बीएमसीच्या पथकाला घरात घेतले नाही

Subscribe

हिंदी सिनेसृष्टीतील गाजलेल्या अभिनेत्री रेखा यांच्या सी स्प्रिंग बंगल्यातील सुरक्षारक्षकाला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांचा बंगला सील करण्यात आला होता. तसेच त्यांच्या बंगल्या शेजारी असणाऱ्या आणखी चार बंगल्यातील सुरक्षा रक्षकांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने रेखा आणि त्यांच्या बंगल्यातील त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे पालिकेचे पथक बंगल्यावर गेले असता रेखा यांच्या मॅनेजरने चाचणी घरुन घेण्यास नकार दिला. रेखा यांची प्रकृती ठिक असून गरज पडल्यास त्या खासगी लॅबमधून टेस्ट करतील असे उत्तर रेखा यांच्या मॅनेजरने पालिकेला दिले.

पालिकेचे पथक रेखा, त्यांचे तीन कर्मचारी आणि दुसऱ्या सुरक्षा रक्षकाचा स्वॅब घेण्यासाठी सी स्प्रिंग बंगल्यावर पोहोचले होते. मात्र कुणीही बंगल्याचा दरवाजा उघडला नाही. काही वेळाने रेखा यांच्या मॅनेजर फरजाना यांनी दरवाजाच्या आडूनच पथकाकडे इथे येण्याचे कारण विचारले. पालिकेने त्यांना कोरोना चाचणीसाठी आलो आहे, असे सांगितल्यानंतर फरजाना यांनी त्यांचा नंबर देऊन आम्ही तुमच्याशी नंतर बोलू, असे सांगितले.

- Advertisement -

दरम्यान पालिकेच्या एच पश्चिम वॉर्डचे मुख्य वैद्यकीय अधिकारी संजय फगे यांनी फरजाना यांना संपर्क साधला. त्यानंतर फरजाना यांनी सांगितले की, “रेखा यांची प्रकृती ठिक असून त्या कुणाच्याही संपर्कात आलेल्या नाहीत.” यानंतर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, “रेखा यांचा बाहेरील कोणत्याही व्यक्तिशी संबंध आलेला नव्हता. सध्या त्या घरीच क्वारंटाईन राहून काळजी घेत आहेत. जर गरज वाटल्यास त्यांची चाचणी करण्यात येईल.”

रेखा यांनी चाचणीला नकार दिल्यानंतर पालिकेने सॅनिटाईज करणारे पथकही बंगल्यावर पाठवले होते. मात्र त्यांनाही बंगल्याच्या आत घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे पालिकेने बंगल्याच्या बाहेरील भाग, आजुबाजूचा परिसर आणि सुरक्षा रक्षकाची केबिन सॅनिटाईज करुन पुन्हा माघारी फिरले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -