वयाच्या ६० व्या वर्षी संजूबाबा पडला प्रेमात!

संजूबाबा ज्या पूजाशी बोलत आहे ती पूजा म्हणजे आयुषमान खुरानाचे ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटातील पात्र आहे. संजूबाबांचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Mumbai

आपल्या चित्रपटांइतकाच अफेअरमुळे चर्चेत असलेला संजूबाबा पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. काही वर्षांपूर्वीच संजय दत्तने मान्यताशी तिसरे लग्न केले. आता पुन्हा एकदा संजय दत्तचा एका मुलीला आय लव्ह यू बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मुलीचं नाव पुजा आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडीओतील मुलगी कोण आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

संजय दत्तचा हा व्हिडीओ मालिका क्विन एकता कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संजय दत्त पूजा नावाच्या मुलीशी प्रेमात बोलताना दिसत आहे आणि तो बोलत असताना एक कॅमेरा त्याला शूट करताना दिसत आहे. संजूबाबा फोनवर बोलत असताना त्याची नजर कॅमेरावर जाते आणि तो चिडून कॅमेरा बंद करायला सांगतो. त्यानंतर संजूबाबा तिला डेटवर येण्यास विचारताना दिसत आहे. संजूबाबा नक्की कोणत्या मुलीशी बोलत असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्या दोघांची १३ तारीख ही डेटिंगची तारीखपण ठरली आहे.

हा व्हिडीओ संजूबाबाच्या कोणत्या अफेअरचा नाही तर आयुषमान खुरानाचा आगामी चित्रपट ‘ड्रीम गर्ल’च्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आला आहे. संजूबाबा ज्या पूजाशी बोलत आहे ती पूजा म्हणजे आयुषमान खुरानाचे ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटातील पात्र आहे. संजूबाबांचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत एकता कपूरने ‘मुन्ना भाईदेखील ड्रीम गर्लला भेटण्यासाठी उत्सुक आहे’ असे कॅप्शन दिले आहे. आयुषमानचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट येत्या १३ ऑगस्ट रोजी चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आयुषमान कॉल सेंटरमध्ये नोकरी करण्यासाठी एका मुलीची भूमिका साकारतो आणि फोनवर मुलीच्या आवाजात बोलतो. त्याच्या या पात्राचे नाव पूजा असे आहे. या चित्रपटात आयुषमानसह नुसरत भारुचा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. आयुषमानच्या या चित्रपटाचा ट्रेलर येताच चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता वाढली आहे. आयुष्यमानची ड्रीम गर्ल, त्याच्या चाहत्यांसाठी ड्रीम रोल ठरणार आहे.